शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

Kolhapur News: आईला त्रास दिल्यानेच शिक्षकावर खुनी हल्ला, पोलिस तपासात उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 12:24 IST

हल्ला करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले

कोल्हापूर : अनेकवेळा आईला फोन करून त्रास दिल्याच्या रागातून कदमवाडी शाळेतील शिक्षक संजय आनंदा सुतार (४५, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) यांच्यावर खुनी हल्ला झाल्याचे मंगळवारी पोलिस तपासात समोर आले. याप्रकरणी हल्ला करणारे विचारेमाळ पन्हाळकर गल्लीतील दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून हल्ल्यासाठी वापरलेला कोयता व इतर साहित्य जप्त करण्यात आले.पोलिसांनी सांगितले की, शिक्षक संजय सुतार यांच्यावर सोमवारी दुपारी दोघांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा हल्ला नववीच्या वर्गातील विद्यार्थ्याला वर्गात दंगा करतोस म्हणून अंगठा धरण्याची शिक्षा दिल्याच्या रागातून झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले होते.

मात्र, ज्या द्वेषातून संजयवर हल्ला करण्यात आला, जिवे मारण्यासाठी म्हणून कोयत्याने सपासपा वार केले, यावरून कारण आणखी काळी वेगळे असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली. तपासात शिक्षकाने त्या नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आईच्या मोबाइलवर अनेकवेळा संपर्क साधून त्रास दिल्याचे स्पष्ट झाले. याचा प्रचंड राग आल्याने शिक्षा दिलेल्या विद्यार्थ्याचा भाऊ आणि मित्राने शिक्षक संजय यांच्यावर हल्ला केले. हल्ल्याचे कारण वेगळेच समोर आल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. यामध्ये आणखी कोण आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTeacherशिक्षक