शेतीच्या वादातून भावावर खुनी हल्ला: तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 10:45 IST2019-11-02T10:44:22+5:302019-11-02T10:45:29+5:30

वेतवडे पैकी मुसलमानवाडी (ता. पन्हाळा) येथे शुक्रवारी शेतजमिनीच्या वादातून भावावर खुरप्याने डोक्यात वार करून खुनी हल्ला केला. महमद अहमद शेख (वय ५५) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. नऊ टाके पडले आहेत.

A murderous attack on a brother through a farming dispute | शेतीच्या वादातून भावावर खुनी हल्ला: तिघांवर गुन्हा

शेतीच्या वादातून भावावर खुनी हल्ला: तिघांवर गुन्हा

ठळक मुद्देशेतीच्या वादातून भावावर खुनी हल्ला: तिघांवर गुन्हावेतवडे पैकी मुसलमानवाडी येथील घटना

कोल्हापूर : वेतवडे पैकी मुसलमानवाडी (ता. पन्हाळा) येथे शुक्रवारी शेतजमिनीच्या वादातून भावावर खुरप्याने डोक्यात वार करून खुनी हल्ला केला. महमद अहमद शेख (वय ५५) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. नऊ टाके पडले आहेत.

जखमी महमद शेख यांनी सीपीआर पोलीस चौकीत दिलेली माहिती अशी, भाऊ इब्राहीम अहमद शेख आणि माझा शेत जमिनीचा वाद पूर्वीपासून आहे. शुक्रवारी सकाळी १0.३0 च्या सुमारास शेताच्या वादातून भाऊ इब्राहीम याने शिवीगाळ केली.

यावेळी त्याचा मुलगा फारुख, सून रजिया शेख असे तिघेजण मिळून अंगावर आले. भाऊ इब्राहीम याने खुरप्याने डोक्यात वार केल्याने जखमी झालो. त्यानंतर नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये दाखल केले.

या तिघांविरोधात आपली तक्रार असल्याचे सांगितले. महमद शेख यांच्या डोक्यात खोलवर वार झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
 

 

Web Title: A murderous attack on a brother through a farming dispute