यड्रावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 13:09 IST2021-06-12T13:08:36+5:302021-06-12T13:09:44+5:30
Crimenews Kolhapur : यड्राव येथील तरुणाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. प्रशांत भिकाजी भोसले (वय ३५, रा. बेघर वसाहत, यड्राव) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पिंटू आदमाने यास संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.

यड्रावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून
यड्राव : येथील तरुणाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. प्रशांत भिकाजी भोसले (वय ३५, रा. बेघर वसाहत, यड्राव) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पिंटू आदमाने यास संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.
घटनास्थळावरून समजलेली माहिती प्रशांत भोसले याच्याबरोबर पिंटू आदमाने यांचे रात्री साडेदहाच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ वाद सुरू होता. यावेळी पिंटू आदमाने यांनी धारदार शस्त्राने प्रशांतवर वार केले. वार वर्मी लागल्याने प्रशांतच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी इचलकरंजी येथे खासगी दवाखान्यात नेले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदनासाठी इचलकरंजीच्या आयजीएम दवाखान्यात नेले.
प्रशांत मृत झाल्याचे समजल्याने नातेवाईकांचा आक्रोश ह्रदय पिळवटणारा होता. शहापूर पोलिसांनी संशयित म्हणून पिंटू आदमाने यास ताब्यात घेतले आहे.