सोशल मीडियावर ‘मर्डर’चे स्टेटस ठेवणाऱ्या संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST2020-12-24T04:22:05+5:302020-12-24T04:22:05+5:30

येथील ईदगाह मैदानाजवळ पूर्ववैमनस्यातून १० डिसेंबर २०१९ ला दीपक महादेव कोळेकर (२६) याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या ...

Murder suspect arrested on social media | सोशल मीडियावर ‘मर्डर’चे स्टेटस ठेवणाऱ्या संशयितास अटक

सोशल मीडियावर ‘मर्डर’चे स्टेटस ठेवणाऱ्या संशयितास अटक

येथील ईदगाह मैदानाजवळ पूर्ववैमनस्यातून १० डिसेंबर २०१९ ला दीपक महादेव कोळेकर (२६) याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणात आकाश याच्यासह अक्षय नरळे, मेहबूब उकले, आदिनाथ बावणे, सुनील वाघवे, कासिम नदाफ व सागर आंबले या सातजणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, हे सर्वजण सध्या जामिनावर बाहेर आहेत. यातील आकाश याने वर्षपूर्तीसंदर्भातील व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर स्टेटसला ठेवला होता. ही माहिती पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांना सोमवारी (दि.२१) समजली. त्यांनी शिवाजीनगर पोलिसांच्या पथकामार्फत सोमवारी रात्रीच त्याला अटक केली. मंगळवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याची १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी संबंधातील फोटो, मेसेज यांचा वापर केल्याचे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यानिमित्ताने महामुनी यांनी दिला.

Web Title: Murder suspect arrested on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.