शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus :महापालिकेच्या अधिकाऱ्याला आयुक्तांनी दिला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:40 IST

अत्यंत शिस्तप्रिय असणारे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या नजरेतून महापालिकेचे अधिकारीही सुटलेले नाहीत. याचीच प्रचिती सोमवारी सकाळी पुन्हा एकदा आली. आस्थापना अधीक्षक सागर कांबळे महापालिका परिसरातून विनामास्क जात होते. यावेळी आयुक्तांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी कांबळे यांना जाब विचारत पाचशे रुपयांचा दंड केला.

ठळक मुद्देमहापालिकेच्या अधिकाऱ्याला आयुक्तांनी दिला दणकामास्क न लावल्यामुळे दंड : आस्थापना अधीक्षकावरच थेट कारवाई

कोल्हापूर : अत्यंत शिस्तप्रिय असणारे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या नजरेतून महापालिकेचे अधिकारीही सुटलेले नाहीत. याचीच प्रचिती सोमवारी सकाळी पुन्हा एकदा आली. आस्थापना अधीक्षक सागर कांबळे महापालिका परिसरातून विनामास्क जात होते. यावेळी आयुक्तांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी कांबळे यांना जाब विचारत पाचशे रुपयांचा दंड केला.कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कामातून वेगळा ठसा उमटविला आहे. दर रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेमुळे ते राज्यात स्वच्छतादूत म्हणून परिचित झाले आहेत. शहर स्वच्छ, प्लास्टिक मुक्त, प्रदूषणमुक्त राहावे असा त्यांचा नेहमी अट्टहास असतो.

एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गेल्यानंतर प्लास्टिकचा वापर करीत असल्याचे आढळून आल्यास कार्यक्रमाला आमंत्रण देणाऱ्या संयोजकालाच त्यांनी थेट दंड लावल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या या कारवाईतून महापालिकेचे कर्मचारी, अधिकारीही सुटलेले नाहीत. मंगेशकरनगरात स्वच्चता मोहीम आटोपून एका अधिकाऱ्याच्या घरी चहा पिण्यासाठी गेल्यानंतर दारात कचरा जाळल्याप्रकरणी त्यांच्या हातावर पाचशे रुपयांची पावती ठेवली. असे अनेक घटना घडल्या.

सोमवारी पुन्हा एकदा त्यांच्या शिस्तीची प्रचिती आली. अस्थापना अधीक्षक सागर कांबळे विनामास्क फिरत असल्यावरून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावरही कारवाई केली. शहरात सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करीत नसणारे, मास्क, हँडग्लोज न वापरणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. नागरिकांवर जर दंडात्मक कारवाई करीत असेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेगळा नियम नाही, असा संदेशच त्यांनी या कारवाईतून दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर