शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एम.फिल., पीएच.डी.ची प्रवेश परीक्षा ‘आॅफलाईन’!

By admin | Updated: August 26, 2015 00:48 IST

विद्यापीठ घेणार परीक्षा : आजपासून आॅनलाईन अर्जांची प्रक्रिया सुरू!

कोल्हापूर : परीक्षाविषयक कामकाजाबाबत ‘एमकेसीएल’वरील अवलंबित्व कमी करण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून शिवाजी विद्यापीठ स्वत:च्या यंत्रणेमार्फत एम. फिल., पीएच.डी.च्या प्रवेश परीक्षा घेणार आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आज, बुधवारपासून सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या परीक्षा आॅनलाईन घेतल्या जात होत्या. मात्र, यावर्षी आॅफलाईन पद्धतीने होणार आहे.विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या एम.फिल., पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, परीक्षेची तारीख विद्यापीठाने मंगळवारी जाहीर केली. विविध विद्याशाखांसाठी पीएच.डी.च्या ९०० आणि एम.फिल.च्या ५४० जागा आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना आजपासून नऊ सप्टेंबरपर्यंत (ँ३३स्र://ङ्मल्ल’्रल्ली.२ँ्र५ं्न्र४ल्ल्र५ी१२्र३८.्रल्ल) या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करावयाचा आहे. त्यातील प्रत्येक विषयासाठी शंभर गुणांची प्रवेश परीक्षा आॅफलाईन पद्धतीने ओएमआर शीटद्वारे घेतली जाणार आहे. या परीक्षेतूनमुलाखतीसपात्र होण्यासाठी ४० गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठाची एम.फिल. थेअरी अथवा पदवी प्राप्त असल्यास प्रवेश परीक्षेतून सूट देण्यात येईल. (प्रतिनिधी)प्रवेश प्रक्रिया व परीक्षा-विषयक कामकाजाबाबतचा ‘एमकेसीएल’वर अवलंबित्व कमी करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून एम. फिल., पीएच.डी.च्या प्रवेश परीक्षा विद्यापीठ आपल्या यंत्रणेमार्फत घेणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिवाय प्रथम वर्षाच्या परीक्षादेखील विद्यापीठ स्वत:कडे घेण्याच्या विचारात आहे.- डॉ. डी. आर. मोरे, संचालक, बीसीयुडी.