शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरूच

By admin | Updated: January 23, 2015 00:48 IST

चर्चा निष्फळ : मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार

कोल्हापूर : भूमी अभिलेख खात्यातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या नियमांत शासनाने बदल करून, आता खात्यात नवीन भरती केलेले कर्मचारी तांत्रिक असल्याने तांत्रिक वेतनश्रेणीचा निर्णय तत्काळ घ्यावा, यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेतर्फे बुधवार पेठेतील भूमी अभिलेख कार्यालयासमोर सुरू असलेले धरणे आंदोलन आज, गुरुवारी सातव्या दिवशीही सुरू होते. काल, बुधवारी प्रशासनाबरोबर झालेली बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलन टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी करण्याचा निर्णय झाला आहे. भूमी अभिलेख खाते हे तांत्रिक खाते म्हणून घोषित करावे. शेतकऱ्यांना द्यावयाच्या नकाशाची ‘क’ प्रत पाठविण्यासाठी महिन्याची मुदत मिळावी. ई-मोजणी प्रक्रियेत अर्ज दाखल करताना सहहिस्सेदार हजर राहू शकत नसल्यामुळे ही पद्धत अव्यवहार्य आहे. त्यामुळे अर्ज दाखल करताना छापील अर्ज दाखल करण्यास परवानगी द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळेल. पुनर्भेट फी मोजणी प्रकरणी पीक खोटीवर निकाल झाल्यानंतर अर्जदारांनी १५ दिवसांत पुनर्भेट फी भरणे बंधनकारक केले आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे; कारण कारखान्याची ऊस पीकतोड केल्याशिवाय शेत उपलब्ध होत नाही. यासाठी दोन महिने लागतात. त्यामुळे ही फी भरण्यास दोन महिन्यांचा कालावधी द्यावा. भूमी अभिलेख विभागातील १९९४ नंतर अस्तित्वात असलेल्या आस्थापनेतील ३० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे मोजणी प्रकरणे, अभिलेख पुनर्लेखन, पुनर्गठण, यावर त्याचा परिणाम होत आहे. हे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांनी केला आहे.आंदोलनात दिलीप कुरणे, अमोल बरडे, एस. पी. सन्नके, सोनबा निगडे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)