शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

आईने मुलीला जगण्याचे भान द्याव

By admin | Updated: January 24, 2015 00:08 IST

अपर्णा रामतीर्थकर : कणेरी येथे मातृशक्ती उत्सवाला गर्दीे

कोल्हापूर : करिअर आणि फॅशनच्या नावाखाली महिला सध्या सर्व मर्यादा ओलांडत आहेत. भारतीय संस्कृतीत ते नाही. चूल-मूल, सासर-माहेर आणि पै-पाहुणे सांभाळून स्वत:चे अस्तित्व जपायचे म्हणजेच करिअर आहे. त्यामुळे संस्कृती जपण्यासाठी आईने स्वत: जागे होऊन मुलींना जगण्याचे भान द्यावे, असे प्रतिपादन सोलापूरच्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी आज, शुक्रवारी येथे केले. कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावरील भारतीय संस्कृती उत्सवात मातृशक्ती उत्सवात त्या बोलत होत्या.अ‍ॅड. रामतीर्थकर म्हणाल्या, महिला शिकतात, नोकरी करतात, घर सजवितात, आर्थिक स्वावलंबी होतात. मात्र, त्या कुटुंबात यशस्वी होतील, याची खात्री नाही. स्त्रीशक्तीऐवजी स्त्रीमुक्तीकडे महिला धावत आहेत. ते भारतीय संस्कृतीत नाही, भारतीयांना ते रुचणारे नाही. ज्याला आई समजते, त्याला समाज समजतो. डॉ. काटधरे म्हणाल्या, घर हे संस्कृतीचे केंद्र असून त्याचे घरपण कायम कसे राहील, हे स्त्रियांनी पाहावे. सध्या स्त्रिया घरकाम दुय्यम ठरवून करिअरला प्राधान्य देत असून हे घराला मारक, संस्कृती संपविणारे आहे. अरुंधती महाडिक म्हणाल्या, आपल्या देशासारखी संस्कृती जगात कुठेच नाही. सण-उत्सवांद्वारे मुलांवर संस्कार करण्याचे काम घरच्या महिला करतात. आई मुलांना योग्य दिशा देते. यावेळी माताजी वाग्देवी (कर्नाटक), श्यामजीभाई जाजू यांनी विचार मांडले. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार भास्करराव जाधव, आदी उपस्थित होते. आमदार शशिकला ज्वोल्ले यांनी स्वागत केले.स्वयंसेविका पॅँटमध्ये कशा?या संस्कृती उत्सवात स्वयंसेविका पॅँटमध्ये कशा आणि उत्सव पाहायला येणाऱ्या मुलींच्या चुडीदारवरील ओढण्या कुठे आहेत, अशी विचारणा अ‍ॅड. रामतीर्थकर यांनी केली. त्या म्हणाल्या, पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरा, केस मोकळे सोडू नका, असे भारतीय संस्कृती सांगते. अगदी त्याउलट फॅशनच्या नावाखाली महिला, मुलींचे वर्तन आहे. ते धोकादायक ठरणारे आहे.मिशा फुटणार नाहीत, याची दक्षता घ्यामहिलांना देवाने पुरुषांपेक्षा शंभर गुण अधिक दिले आहेत. त्यांनी पुरुषार्थ गाजविला पाहिजे; पण पुरुष होण्याचा प्रयत्न करू नये. पुरुष होण्याचा प्रयत्न करा; मात्र मिशा फुटणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन अ‍ॅड. रामतीर्थकर यांनी यावेळी केले.