पिसाळलेल्या कुत्र्याचा १० हून अधिक मुलांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:23 IST2021-02-12T04:23:24+5:302021-02-12T04:23:24+5:30

कोल्हापूर : कळंबा परिसरात गुरुवारी संध्याकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने दहा, बारा मुलांचा चावा घेतला. या सर्वांना ...

More than 10 children are bitten by a stray dog | पिसाळलेल्या कुत्र्याचा १० हून अधिक मुलांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा १० हून अधिक मुलांना चावा

कोल्हापूर : कळंबा परिसरात गुरुवारी संध्याकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने दहा, बारा मुलांचा चावा घेतला. या सर्वांना सीपीआरसह खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

कळंबा आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपदरव वाढला आहे. केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाही भटकी कुत्री अंगावर येतात, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. गुरुवारी सायंकाळी असेच एक चॉकलेटी रंगाचे कुत्रे अचानक पिसाळले. गल्लीत खेळणाऱ्या मुलांचा चावा घेण्यास त्याने सुरुवात केली. तसा आरडाओरडा सुरू झाला. त्यामुळे नागरिक जमा झाले आणि कुत्र्याचा शोध सुरू करण्यात आला.

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले सार्थक साळोखे (वय ७), राजवीर खोत (वय ५), सोहेल देसाई (वय १०), सचिन भोसले (वय ५) या मुलांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर अन्य मुलांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

११्०२्२१ कोल श्वानदंश

Web Title: More than 10 children are bitten by a stray dog