मोक्यातील संशयित शुभम हळदकरचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 19:58 IST2020-11-02T19:57:36+5:302020-11-02T19:58:50+5:30
Crimenews, mokka, police, kolhapurnews दौलतनगर, यादवनगर भागात दहशत माजवणारा आज्या लातूर गँगचा म्होरक्या शुभम अजित हळदकर (रा. दत्त गल्ली, शाहूनगर, कोल्हापूर्) यांचा मोका कारवाईतील जामीन अर्ज कोल्हापुरातील विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. डी. शेळके यांनी सोमवारी फेटाळला. संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का कायद्याप्रमाणे) त्याच्यावर मोक्का न्यायालयात खटला सुरू आहे.

मोक्यातील संशयित शुभम हळदकरचा जामीन फेटाळला
कोल्हापूर : दौलतनगर, यादवनगर भागात दहशत माजवणारा आज्या लातूर गँगचा म्होरक्या शुभम अजित हळदकर (रा. दत्त गल्ली, शाहूनगर, कोल्हापूर्) यांचा मोका कारवाईतील जामीन अर्ज कोल्हापुरातील विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. डी. शेळके यांनी सोमवारी फेटाळला. संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का कायद्याप्रमाणे) त्याच्यावर मोक्का न्यायालयात खटला सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजारामपुरीतील दौलतनगर, यादवनगर परिसरात दहशत माजवत संघटित गुन्हेगारीची आज्या लातूरची गँग वावरत होती. या गँगकडून दहशत माजविण्यासाठी लोकांशी नाहक वादावादी केली जात होती. संशयित आरोपी शुभम हळदकर आणि फिर्यादी ओंकार उदय निंबाळकर (रा. तीन बत्ती चौक, दौलतनगर) यांच्यात वाद होता. त्या वादातूनच निंबाळकर याला कोयता, लोखंडी रॉड, लोखंडी पट्टीने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
त्यामुळे हळदकरसह सर्व आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) पुणे मोक्का न्यायालयात खटला सुरू होता. पण ऑगस्टनंतर कोल्हापुरातील सर्व खटले कोल्हापुरातील विशेष न्यायालयात वर्ग केले. त्यावेळी संशयित हळदकर याने जामिनासाठी कोल्हापूर न्यायालयात अर्ज केला होता. त्याची सुनावणी सोमवारी झाली. सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील विवेक शुल्क यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून संशयित हळदकरचा जामीन अर्ज फेटाळला.