‘गोकुळ’ सॅटेलाईट डेअरी राज्यात मॉडेल : राजीव जाधव
By Admin | Updated: June 19, 2017 17:24 IST2017-06-19T17:24:01+5:302017-06-19T17:24:01+5:30
कोल्हापूरात सॅटेलाईट डेअरीला दिली भेट

‘गोकुळ’ सॅटेलाईट डेअरी राज्यात मॉडेल : राजीव जाधव
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १९ : ‘गोकुळ’ दूध संघाने शिरोळ तालुक्यातील उभारलेली सॅटेलाईट डेअरी राज्यात आदर्श मॉडेल असल्याचे गौरवोद्गार दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी काढले.
जाधव यांनी सॅटेलाईट डेअरीला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. या डेअरीमध्ये इचलकरंजी, जयसिंगूपरसह सांगली, मिरज व सातारा जिल्ह्यांतील दुधावर प्रक्रिया करून पॅकिंग केले जाते तेथून थेट मुंबई बाजारपेठेत पाठविले जात असल्याचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी सांगितले.
यावेळी महाव्यवस्थापक आर. सी. शहा, सहाय्यक निबंधक(दुग्ध) अरुण चौगले, शिरोळ शाखेचे प्रमुख सचिन जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी प्रकाश दळवी आदी उपस्थित होते. दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी ‘गोकुळ’च्या शिरोळमधील सॅटेलाईट डेअरीला भेट देऊन पाहणी केली.