संशयित आरोपींच्या घरावर बुधवारी जमावाच हल्ला-पूर्ववैमनस्यातून संपूर्ण प्रापंचिक साहित्यासह वस्तूंची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 14:33 IST2018-11-21T14:32:04+5:302018-11-21T14:33:01+5:30
चार दिवसापूर्वी पूर्ववैमनस्यातून नेहरुनगर येथील सनी संजय आवळे (वय 17) याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपींच्या घरावर बुधवारी सकाळी जमावाने हल्ला केला.

संशयित आरोपींच्या घरावर बुधवारी जमावाच हल्ला-पूर्ववैमनस्यातून संपूर्ण प्रापंचिक साहित्यासह वस्तूंची तोडफोड
इचलकरंजी : चार दिवसापूर्वी पूर्ववैमनस्यातून नेहरुनगर येथील सनी संजय आवळे (वय 17) याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपींच्या घरावर बुधवारी सकाळी जमावाने हल्ला केला. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संतप्त जमावाने अक्षय कोळी, आकाश बेळगावकर व अल्पवयीन संशयितांच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली.
या घटनेमुळे नेहरुनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हल्ल्यात बेळगांवकर याच्या दुमजली घरात घुसून संपूर्ण प्रापंचिक साहित्यासह सर्वच वस्तूंची तोडफोड केली. त्यानंतर अल्पवयीन संशयिताच्या घरावर हल्ला चढवत दारातील कच्चे बांधकाम असलेले स्वच्छतागृह पाडून टाकले. तसेच पाण्याची टाकी फोडून घरातील साहित्याचीही मोडतोड केली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. याबाबतची माहिती समजताच पोलिस निरिक्षक इरगोंडा पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पंचनामा करुन गुन्हे दाखल करण्याचे काम पोलिसात सुरु होते.