शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

कोडोली उपजिल्हा रुग्णालयात विविध समस्याबाबत मनसेचा ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 20:38 IST

कोडोली (ता. पन्हाळा) येथील उपजिल्हा रुग्णालयात गैरसोयी बाबत वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाकडून पुर्तता होत नसल्याने गुरुवारी कोडोली मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकोडोली उपजिल्हा रुग्णालयात विविध समस्याकोडोली मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन

कोडोली : कोडोली ( ता. पन्हाळा ) येथील उपजिल्हा रुग्णालयात गैरसोयीबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाकडून पुर्तता होत नसल्याने गुरुवारी कोडोली मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी इमारतीच्या दुरुस्ती बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोळी व आयरेकर यांनी इमारत दुरुस्ती संदर्भात आठ दिवसात पुर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.कोडोली येथील उप जिल्हा रुग्णालयात दररोज दोनशेहुन अधिक रुग्ण लाभ घेत असतात. या रुग्णालयाची इमारत जुनाट असल्याने ती पावसाळ्यात गळत आहे. याचा त्रास रूग्णांना होत आहे. त्याचप्रमाणे निवासी डॉक्टरांसाठी बांधलेली निवासस्थानामध्ये कोणही रहात नसल्याने मोडकळीस आली आहेत.

ही निवासस्थाने दुरुस्ती करावीत तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी यासाठी वेळोवेळी आंदोलने करत पत्रव्यवहार करूनही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने हे ठिय्या आंदोलन केले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षदा वेदक या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आल्या असता मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.

यावेळी सार्वजनिक बांधकामाचे कोळी व आयरेकर यांनी येऊन रुग्णालयाची पाहणी करून आठ दिवसात इस्टिमेंट सादर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी मनसे जिल्हाउपाध्यक्ष संजय पाटील, तालुका अध्यक्ष विशाल मोरे, तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड, तालुका सचिव लखन लादे, गणेश झुगर, रोहित मिटके, कोडोली शहर अध्यक्ष रमेश मेणकर,कोडोली उपशहर अध्यक्ष तुषार चिकूर्डेकर, निहाल मुजावर, अक्षय कांबळे यांचेसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर