शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काटा मारणारे महाडिक यांचा काटा काढा, सतेज पाटील यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 12:28 IST

सहकारातील मंदिर टिकावे याकरिता लढाई

अभय व्हनवाडेरुकडी : काटा मारणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनाच आता काटा मारून राजाराम सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा करा. सभासदाचा मालकीचा कारखाना हवा असेल तर परिवर्तन आवश्यक आहे असे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी रूकडी (ता.हातकणगंले) येथे कारखाना निवडणुकीतील प्रचार सभेत सांगितले. अध्यक्षस्थानी हातकणगंले  काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवानराव जाधव होते.माजी मंत्री पाटील म्हणाले, गेली २८ वर्षे कारखान्याची  लूट सुरू आहे. कारखान्यातील यंञापासून ते कामगार बेडकीहाळकडे नेवून राजाराम कारखान्याचे लूट सुरू असून महाडीक स्वताच्या फायद्यासाठी कारखाना चालवत आहेत. कारखान्यास सलग दहावर्ष उस घातला की एक वर्ष तोट्याचा समजावा अशी स्थिती आहे. बोगस सभासदाव्दारे कारखाना ताब्यात ठेवण्याचा कुटील डाव असून कारखाना सभासदांचा व्हावा व सहकारातील मंदिर टिकावे याकरिता आम्ही ही लढाई लढत असल्याचे सांगितले.महाडिक यांनी डी. वाय. पाटील कारखान्यावर आरोप करू नये. डी. वाय. कारखानाने एफआरएफपेक्षा १५० रूपये ज्यादा दर देवून शेतकऱ्यांचे हित साधले. पण महाडिक हे राजाराम कारखान्याचा दर कमी देतात आणि त्यांच्या खासगी कारखान्याला जास्त दर देत असल्याचेही सांगितले.माजी अध्यक्ष सर्जेराव माने म्हणाले, महाडिक यांना तज्ञ संचालक म्हणून घेतले पण हा व्यापारी संचालक यांच्यात भांडणे  लावून कारखाना गिळकृंत केला. कारखान्याच्या दोनशे बैलगाडीचा खर्च राजारामवर, आणि बैलगाडी बेडकीहाळवर अशी लूट सुरू आहे. महाडीक विश्वासघातकी असून सहकारात भगवानराव पवार सारख्या चांगल्या माणसाचा घात केला. कारखान्यात पायपूसणी आणायाचे झाले तरी ते महाडिक यांना विचारावे लागते अशी स्थिती असून व्यापारीच्या हातातील कारखाना काढून सभासदांच्या  मालकीचा व्हावा याकरिता सभासद यानी बदल केला पाहिजे. तालुकाध्यक्ष भगवानराव जाधव यांनी, रूकडी  व परिसरातून  संपूर्ण  मदत करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी बाजीराव पाटील, शशिकांत  खवरे, अॅड.सुरेश  पाटील, किरण भोसले, बाबासाहेब देशमुख, राजू ढवळे, शितल देसाई, बाबासाहेब कापसे सह बहुसंख्य सभासद उपस्थित  होते. अॅड सुरेश  पाटील यांनी  आभार व्यक्त  केले.तळलेल्या काजूला भुललो..माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी महाडिक यांनी कारखाना कसा गिळकृंत केला याचा किस्सा सांगितला ते म्हणाले, महाडिक यांना आवाडे यांच्यामुळे तज्ञ संचालक म्हणून राजाराम कारखान्यामध्ये घेत असताना आम्ही संचालक महाडिक  यांचे तळलेले काजू खावून भुललो व कारखान्याचे नुकसान केले अशी कबूली दिली.कोकरू म्हणून घेतले..महाडिक यांना कोकरू म्हणून कारखान्यात घेतले असता ते लाथ मारत गाढवाचे पिल्लू निघाले असे सांगताच सभासदांत हश्याचे फवारे उडाले..

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिक