आमदार ऋतुराज पाटील कोरोना पॉझिटिव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 18:07 IST2022-01-29T17:40:41+5:302022-01-29T18:07:11+5:30

त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

MLA Rituraj Patil Corona Positive | आमदार ऋतुराज पाटील कोरोना पॉझिटिव्ह 

आमदार ऋतुराज पाटील कोरोना पॉझिटिव्ह 

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

आमदार ऋतुराज पाटील यांनी म्हटले आहे की, नुकतीच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेत आहे. माझी प्रकृती चांगली आहे. कोरोनावर मात करून मी लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन. काळजी घ्या, सुरक्षित रहा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

मात्र याआधी अनेक कार्यक्रमांना तसेच उद्धाटनांना आमदार पाटील यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. 

याआधीच गृहराज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर आज त्यांचे पुतणे आमदार पाटील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्रजासत्ताक दिनीच सतेज पाटील यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याआधी त्यांनी सर्व शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावली होती. ते सध्या घरीच उपचार घेत आहेत.

कोल्हापुरात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्याही जास्त असल्याने दिलासादायक चित्र आहे. मात्र नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच वातावरणातील बदलामुळेही नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: MLA Rituraj Patil Corona Positive