शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

...म्हणून मिळते डॉ.आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी

By संदीप आडनाईक | Updated: April 14, 2023 08:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी माजी आमदार दादासाहेब शिर्के यांनी आंबेडकर जयंतीचा शासकीय सुट्टीचा ठराव विधानसभेत मांडून तो मंजूर करून घेतला.

कोल्हापूर :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी माजी आमदार दादासाहेब शिर्के यांनी आंबेडकर जयंतीचा शासकीय सुट्टीचा ठराव विधानसभेत मांडून तो मंजूर करून घेतला. त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळेच सरकारने ‘१४ एप्रिल’ ही तारीख आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी म्हणून जाहीर केली.

कोल्हापुरातील सिद्धार्थनगर येथे वास्तव्य असलेले दादासाहेब शिर्के यांचा जन्म १९०७ मध्ये झाला, तर २६ डिसेंबर १९८५ रोजी मृत्यू झाला. शिर्के हे १९५७ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाकडून हातकणंगले मतदारसंघातून विजयी झाले होते. डॉ. आंबेडकर यांनीच त्यांना या राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. शिर्के यांनीच आंबेडकर जयंतीसाठी शासकीय स्तरावर सार्वजनिक सुट्टीचा पहिला ठराव विधानसभेत मांडला. विधिमंडळात १९५८ ते १९६१ या काळात संघर्ष करून शिर्के यांनी शासकीय सुट्टीचा ठराव मंजूर करवून घेतला. विरोधी पक्षाचे सभासद या नात्याने मताधिक्य नसतानाही हा ठराव पास करून घेण्यात दादासाहेबांनी आपले संघटना चातुर्य आणि संसदपटूत्व पणाला लावले.

दादासाहेब शिर्केंचा सरकारने केला सन्मान शिर्के यांना २२ जून १९७६ रोजी राज्य सरकारने मानपत्र दिले होते. त्यात याचा उल्लेख आहे.

आंबेडकरांच्या स्मृती जपल्या घरातवयाच्या १४ व्या वर्षी दादासाहेब शिर्के आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट सिद्धार्थनगरातील चिंचेच्या झाडाखाली निपाणीचे बी. एच. वराळे यांनी घडवून आणली. शिर्के यांच्या सिद्धार्थनगरातील घरी डॉ. आंबेडकर मुक्कामी असायचे. आजही ही ऐतिहासिक वास्तू शिर्के परिवाराने जपली असून, डॉ. आंबेडकर यांच्या अस्थी आणि त्यांच्या वापरातील काही वस्तूही जपून ठेवल्या आहेत.