शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅपरेशन मुस्कान’द्वारे बेपत्ता मुलांचा शोध

By admin | Updated: July 3, 2015 00:44 IST

केंद्राची मोहीम : कोल्हापुरात प्रभावीपणे राबविणार

कोल्हापूर : केंद्र सरकारने हरविलेल्या मुलांचा तातडीने शोध लागावा यासाठी १ ते ३१ जुलै दरम्यान ‘आॅपरेशन मुस्कान’ ही मोहीम हाती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही मोहीम पूर्ण क्षमतेने व प्रामाणिकपणे राबविण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिली. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी शंभरपेक्षा जास्त मुले हरवतात. पोलीस ठाण्यात या घटनांची नोंद त्या दिवशी न होता दोन-चार दिवसांनी होते. त्यामुळे त्यांना शोधणं कठीण होतं. मूल हरवल्यानंतर तत्काळ नोंद केल्यास मूल सापडण्याची दाट शक्यता असते. याबाबत जागृती ‘आॅपरेशन मुस्कान’द्वारे करण्यात येणार आहे. ही मोहीम जिल्हास्तरावर सक्षमपणे राबविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी पोलीस मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मोहिमेचा उद्देश स्पष्ट करून हरविलेल्या मुलांचा तत्काळ शोध घ्यावा, तसेच अशा प्रलंबित गुन्ह्यांचा अत्यंत बारकाईने तपास करून ते मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या.‘आॅपरेशन मुस्कान’ म्हणजे काय?ही मोहीम पोलीस श्रम विभाग, महिला व बालकल्याण विभाग संयुक्तपणे राबविणार आहे. जबरदस्तीने होणारी बालमजुरी आणि बालकांचे शोषण रोखणे, महिला आणि मुलींच्या तस्करीला पायबंद घालणे, महिला आणि तरुणींचा सुरक्षित प्रवास, त्यांना सन्मानजनक काम, रोजगाराची संधी यांचा या मोहिमेत समावेश आहे. या मोहिमेत सापडलेल्या मुलांची माहिती संबंधित राज्यांकडून महिला आणि बालकल्याण विभागाच्या ‘मिसिंग चाइल्ड’च्या पोर्टलवर अपलोड केली जाईल.