जलसंधारणातील भ्रष्टाचारप्रश्नी सभागृहात मंत्र्यांनी दिली दिशाभूल करणारी माहिती; कोल्हापुरातील तक्रारदार अरुण हत्ती यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:44 IST2025-12-11T15:43:33+5:302025-12-11T15:44:19+5:30
आलिशान चारचाकी बक्षीस

जलसंधारणातील भ्रष्टाचारप्रश्नी सभागृहात मंत्र्यांनी दिली दिशाभूल करणारी माहिती; कोल्हापुरातील तक्रारदार अरुण हत्ती यांचा आरोप
कोल्हापूर: नागपूरमध्ये सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचारासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला. तारांकित प्रश्नावेळी जलसंधारण मंत्रीसंजय राठोड यांनी सभागृहाची दिशाभूल करणारी माहिती दिली असा आरोप कोल्हापुरातील तक्रारदार अरुण हत्ती यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शासनाची मोठी फसवणूक केली असून या कंपनीविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. असे असताना २०२१ साली जलसंधारण खात्याचे वरिष्ठ अधिकारी सुनील कुशिरे यांनी बेकायदेशीररित्या कंपनीच्या रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण केले आहे.
आलिशान चारचाकी बक्षीस
वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने एक आलिशान चारचाकी गाडी बक्षीस म्हणून देण्यात आल्याचा पुरावा तक्रारदार अरुण हत्ती यांनी दाखवला. ही गाडी सुरुवातीला वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड या नावावर होती, आता ती गाडी कुशिरे यांचे बंधू दिलीप पांडुरंग कुशिरे यांच्या नावाने ट्रान्सफर केल्याची धक्कादायक बाब अरुण हत्ती यांनी सांगितली.