शिवाजी विद्यापीठाला मालवणमध्ये सागरी पर्यावरण केंद्रासाठी जागा, मंत्री नितेश राणे यांचे सकारात्मक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:10 IST2025-02-03T17:07:55+5:302025-02-03T17:10:00+5:30

सागरी केंद्रामुळे काय घडणार.. वाचा सविस्तर

Minimum 5 acres of land at Malvan for Marine Environment Center of Shivaji University A positive step by Minister Nitesh Rane | शिवाजी विद्यापीठाला मालवणमध्ये सागरी पर्यावरण केंद्रासाठी जागा, मंत्री नितेश राणे यांचे सकारात्मक पाऊल

शिवाजी विद्यापीठाला मालवणमध्ये सागरी पर्यावरण केंद्रासाठी जागा, मंत्री नितेश राणे यांचे सकारात्मक पाऊल

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सागरी पर्यावरण केंद्रासाठी मालवण येथे किमान ५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी मत्स्यव्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली. रोजगार क्षमतेला चालना देण्याची इच्छा व्यक्त करून राणे यांनी सकारात्मक पाऊल उचलत मालवण येथील हे सागरी केंद्र पुढील संशोधनास बळकट करण्यास मदत करेल असा आशावाद व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. कांबळे आणि शिंदे यांनी मंत्री राणे यांची भेट घेऊन २००५ पासून प्रलंबित असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या या सागरी पर्यावरण केंद्रासाठी मालवण येथील ५ एकर जागेची मागणी केली. राज्य सरकारने त्यांचे शैक्षणिक जाळे पसरवण्यासाठी आणि चांगले शिक्षण देण्यासाठी खासगी महाविद्यालयांच्या उपक्रमांशी स्पर्धा करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू केला असल्याचे राणे म्हणाले.

सागरी केंद्रामुळे हे घडेल..

  • सागरी जीवनातील जैवविविधतेवर हवामान बदलाचा परिणाम,
  • किनारी वनस्पती आणि प्राणी यांचे बीज उगवण तंत्रज्ञान
  • अन्न तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र
  • किनारी पर्यावरण आणि विषशास्त्र
  • धोक्यात आलेल्या वनस्पती आणि जीवजंतूंचे संवर्धन
  • एकपेशीय वनस्पतींचे फायटो उपाय
  • किनारी प्रदेशांचा ऐतिहासिक आणि पर्यटन अभ्यास
  • किनारी उत्पादनांसाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर
  • किनारपट्टी आणि आर्थिक उन्नतीचे एसडब्लूओटी विश्लेषण.
  • स्थानिकांसाठी कौशल्य आणि रोजगार निर्मिती

Web Title: Minimum 5 acres of land at Malvan for Marine Environment Center of Shivaji University A positive step by Minister Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.