लाखों रुपये पाण्यात

By Admin | Updated: March 26, 2016 01:43 IST2016-03-26T01:43:28+5:302016-03-26T01:43:28+5:30

शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे. कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी याकरिता लाखो रुपये खर्च करुन बंधारे तयार केले जातात.

Millions of rupees in water | लाखों रुपये पाण्यात

लाखों रुपये पाण्यात

शेती पडली कोरडी : बंधाऱ्यांना लागले ग्रहण
आमगाव : शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे. कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी याकरिता लाखो रुपये खर्च करुन बंधारे तयार केले जातात. मात्र तयार झालेले बंधारे एकदोन वर्षात ग्रहण लागल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. एवठी गंभीर शोकांतिका बंधाऱ्याची आहे.
कृषी विभागांतर्गत गतिमान पाणलोट कार्यक्रमांतर्गत नाल्यावर बंधारे तयार केले जातात. मात्र एकदोन वर्षात त्या बंधाऱ्यात पाणी साठवून ठेवण्यांची क्षमता राहत नाही. एकंदरित गतिमान पाणलोट बंधाऱ्याची गती समाप्त होऊन बंधाऱ्यांना ग्रहण लागले आहे.
येरमडा ये वळद मार्ग जो शेती जवळून जाणारा रस्ता आहे. त्याला लागून काही वर्षापुर्वी बंधारा तयार केला गेला. मात्र आज वस्तुस्थिती त्या बंधाऱ्याची अशी आहे की बंधाऱ्याची बाजूती भिंत व माती पाण्याने वाहून गेली आहे. बंधाऱ्याच्या डाव्बाजूला मोठे खड्डे पडल्याने पाणी साचून न राहता बाजूने निघून जातो. ही वस्तुस्थिती कृषी विभागाला माहिती असून त्यावर पाणी साचून राहिले पाहिजे याकरिता कुंभकर्णी अधिकाऱ्यांनी कोणतेच ठोस पाऊल उचचले नाही. केवळ धनिरामाच्या चक्कर मध्ये ऐनकेन काम करुन बंधाऱ्यांना ग्रहण लावण्यात आले. यात अधिकाऱ्यांना सुद्धा प्रत्यक्ष-प्रत्यक्ष सिंहाचा वाटा आहे. एकंदरित लाखो रुपये खर्च करून तयार झालेल्या दोन-तीन वर्षापुर्वीच्या बंधाऱ्यांना खरोखर ग्रहण लागले आहे (तालुका प्रतिनिधी).

Web Title: Millions of rupees in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.