शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे रुपयांच्या पेट्रोलमध्ये ग्राहकांची सूक्ष्म लूट, कोल्हापुरातील प्रकार चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 17:18 IST

‘जागो ग्राहक जागो’चा नारा देत नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर : शहरातील काही पेट्रोलपंपांवर दुचाकीधारकांकडून २०० रुपयांचे पेट्रोल भरताना सूक्ष्म स्वरूपात जादा रक्कम आकारली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.ग्राहकांना २०० रुपयांचे पेट्रोल दिले जात असताना प्रत्यक्षात १.९०० लिटर पेट्रोल देण्यात येत असून, त्याची किंमत १९८.५८ रुपये इतकी होते. मात्र, ग्राहकांकडून पूर्ण २०० रुपये वसूल केले जात असल्याने प्रतिव्यवहार १.४२ रुपये इतकी जादा रक्कम घेतली जात असल्याचा आरोप होत आहे.हा प्रकार किरकोळ वाटत असला तरी मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असल्याने एकूण रकमेचा आकडा मोठा होतो. विशेष म्हणजे अनेक ग्राहक या बाबीकडे दुर्लक्ष करत असून, पंपावरील डिजिटल मीटरकडे बारकाईने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे ‘सूक्ष्म लूट’ सुरू असल्याचा आरोप मोहन शेटे यांनी केला आहे.तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ग्राहकांनी पेट्रोल भरताना लिटर व रक्कम यांची पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच डिजिटल पेमेंटचा वापर केल्यास व्यवहाराची स्पष्ट नोंद राहते. काही ठिकाणी डिजिटल पेमेंट टाळले जाण्याचे हे एक कारण असू शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ‘जागो ग्राहक जागो’चा नारा देत नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत शासकीय यंत्रणांनी लक्ष घालून तपास करावा, तसेच दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी. - मोहन देवेंद्र शेटे, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Subtle Petrol Theft at Kolhapur Pumps: Customers Shortchanged Two Rupees

Web Summary : Kolhapur petrol pumps allegedly shortchange customers buying ₹200 petrol by delivering slightly less fuel, pocketing ₹1.42 per transaction. Customers are urged to check meter readings and use digital payments to avoid this 'micro-theft'. Authorities are urged to investigate.