दोनशे रुपयांच्या पेट्रोलमध्ये ग्राहकांची सूक्ष्म लूट, कोल्हापुरातील प्रकार चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 17:18 IST2026-03-28T17:18:16+5:302026-03-28T17:18:47+5:30

‘जागो ग्राहक जागो’चा नारा देत नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Micro robbery of customers in petrol worth Rs 200 in Kolhapur | दोनशे रुपयांच्या पेट्रोलमध्ये ग्राहकांची सूक्ष्म लूट, कोल्हापुरातील प्रकार चर्चेत

दोनशे रुपयांच्या पेट्रोलमध्ये ग्राहकांची सूक्ष्म लूट, कोल्हापुरातील प्रकार चर्चेत

कोल्हापूर : शहरातील काही पेट्रोलपंपांवर दुचाकीधारकांकडून २०० रुपयांचे पेट्रोल भरताना सूक्ष्म स्वरूपात जादा रक्कम आकारली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.
ग्राहकांना २०० रुपयांचे पेट्रोल दिले जात असताना प्रत्यक्षात १.९०० लिटर पेट्रोल देण्यात येत असून, त्याची किंमत १९८.५८ रुपये इतकी होते. मात्र, ग्राहकांकडून पूर्ण २०० रुपये वसूल केले जात असल्याने प्रतिव्यवहार १.४२ रुपये इतकी जादा रक्कम घेतली जात असल्याचा आरोप होत आहे.

हा प्रकार किरकोळ वाटत असला तरी मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असल्याने एकूण रकमेचा आकडा मोठा होतो. विशेष म्हणजे अनेक ग्राहक या बाबीकडे दुर्लक्ष करत असून, पंपावरील डिजिटल मीटरकडे बारकाईने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे ‘सूक्ष्म लूट’ सुरू असल्याचा आरोप मोहन शेटे यांनी केला आहे.

तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ग्राहकांनी पेट्रोल भरताना लिटर व रक्कम यांची पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच डिजिटल पेमेंटचा वापर केल्यास व्यवहाराची स्पष्ट नोंद राहते. काही ठिकाणी डिजिटल पेमेंट टाळले जाण्याचे हे एक कारण असू शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ‘जागो ग्राहक जागो’चा नारा देत नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत शासकीय यंत्रणांनी लक्ष घालून तपास करावा, तसेच दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी. - मोहन देवेंद्र शेटे, कोल्हापूर

Web Title : कोल्हापुर में पेट्रोल पंपों पर सूक्ष्म चोरी: ग्राहकों को दो रुपये का चूना

Web Summary : कोल्हापुर के पेट्रोल पंप कथित तौर पर ₹200 का पेट्रोल खरीदने वाले ग्राहकों को थोड़ा कम ईंधन देकर धोखा दे रहे हैं, जिससे प्रति लेनदेन ₹1.42 की कमाई हो रही है। ग्राहकों से मीटर रीडिंग की जांच करने और इस 'सूक्ष्म चोरी' से बचने के लिए डिजिटल भुगतान का उपयोग करने का आग्रह किया गया है। अधिकारियों से जांच करने का आग्रह किया गया है।

Web Title : Subtle Petrol Theft at Kolhapur Pumps: Customers Shortchanged Two Rupees

Web Summary : Kolhapur petrol pumps allegedly shortchange customers buying ₹200 petrol by delivering slightly less fuel, pocketing ₹1.42 per transaction. Customers are urged to check meter readings and use digital payments to avoid this 'micro-theft'. Authorities are urged to investigate.