शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही नळांना बसणार मीटर

By admin | Updated: November 28, 2014 23:45 IST

शासनाच्या निधीतूनच मीटर मिळणार

संदीप बावचे - जयसिंगपूर -शिरोळ तालुक्याला वरदान ठरलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेनंतर आता तालुक्यातील नृसिंहवाडी, शिरढोण व टाकवडे या गावांमध्ये नळांना मीटर बसविण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या तीन गावांतील नळ पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प शासनाच्या निधीतूनच राबविला जाणार आहे. नागरी सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात राष्ट्रीय पेयजल योजना प्रामुख्याने ग्रामीण भागात पुढे आली आहे. शुद्धिकरणासह पाणी नागरिकांना मिळावे, हा उदात्त हेतू पुढे घेऊन ही योजना राबविण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील ३७ गावांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी, शिवाय गावाला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने शासनाने आणखी एक विकासात्मक पाऊल पुढे टाकले आहे. नळांना मीटर बसविण्याचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. नृसिंहवाडी, शिरढोण, टाकवडे या गावांत प्रथम नळांना मीटर बसविण्याचा ग्रामीण भागातील एकमेव प्रकल्प राबविला जाणार आहे. नृसिंहवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या पूर्णत्वास आले आहे, तर शिरढोण-टाकवडे येथेही पेयजल योजनेचे काम सुरू आहे. या तीनही गावांत पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर नळांना मीटर बसविण्यात येणार आहे. शासनानेच याबाबत धोरण निश्चित केले आहे. नळांना मीटर बसवून त्याप्रमाणे किती प्रमाणात पाणी वापरले, तितकेच बिल ग्राहकांना येणार असल्याने काटकसरीने पाणी वापरणाऱ्या ग्राहकांना न्याय मिळणार आहे. जयसिंगपूर नगरपालिकेनंतर शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नळांना मीटर बसविण्याचा पहिलाच प्रकल्प नावारूपास येणार आहे. शासनाची संकल्पनाशासनाच्या पेयजल योजनेमुळे शुद्ध व मुबलक पाणी नागरिकांना मिळणार आहे. योजना मंजूर करीत असतानाच नृसिंहवाडी, शिरढोण, टाकवडे या गावांतील नळांना मीटर बसविण्याच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नळ ग्राहक तेथे मीटर अशी संकल्पना निश्चित राबविली जाणार असून, यामुळे पाण्याचा योग्य वापर नागरिकांना करणे गरजेचे बनणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश कमळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.