ऐन पावसाळ्यात कोल्हापूरचा पारा ३० डिग्रीवर; नागरिक घामाघूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 16:18 IST2024-08-14T16:18:41+5:302024-08-14T16:18:57+5:30
उन्हाने अंग भाजून निघाले

ऐन पावसाळ्यात कोल्हापूरचा पारा ३० डिग्रीवर; नागरिक घामाघूम
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने उघडीप दिली असली तरी तापमानात मोठी वाढ झाली आहे. ऐन पावसाळ्यात पारा वाढल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. मंगळवारी ३० डिग्रीपर्यंत तापमान पोहचल्याने दुपारी अंग भाजून निघत होते.
गेली दोन दिवस जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमान ३० डिग्रीपर्यंत पोहचल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजताच अंगाला चटके बसत होते. ऐन पावसाळ्यात ऑक्टोबर हिटचा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे.
चार दिवसात पावसाची आस
मध्यंतरी तीन आठवडे पाऊस नको नको वाटत होता. गेली चारच दिवस पाऊस थांबला आणि ऊन पडल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. त्यांना पुन्हा पावसाची आस लागली आहे.
तणनाशक फवारणीसाठी शेतकऱ्यांची धांदल
पावसाने उसंत दिल्याने शेतीच्या कामांची लगबग वाढली आहे. तणनाशक फवारणीसाठी योग्य वातावरण असल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.