शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी एफआरपीसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत ३ ऑक्टोबरला बैठक; ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची दखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 12:01 IST

संघटनेच्या ८०० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडले

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करावा, हंगाम २०२२-२३ हंगामातील उर्वरित प्रतिटन १०० रुपये हप्ता द्यावा, यासाठी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिष्टाई करत याबाबत ३ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक लावली आहे. तसे लेखी पत्र निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले.संघटनेने गतवर्षी झालेल्या आंदोलनात २०२२-२३ या हंगामातील गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याबाबत तोडगा निघाला होता. या प्रस्तावाला शासनाने मान्यता न दिल्यामुळे सदरचे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत. गेल्या १० महिन्यांपासून मुख्य सचिवांकडे हा प्रस्ताव दाखल केला आहे. याचा निषेध म्हणून केंद्रीय मंत्री अमित शाह व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून निदर्शन आंदोलन करण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी पहाटेपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली व कोल्हापुरातील ८०० हून अधिक कार्यकर्त्यांना गुन्हा दाखल करण्याबाबत नोटीस देऊन ताब्यात घेण्यात आले.या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ३ ॲाक्टोबरच्या आत बैठक लावून सन २०२२-२३ मधील गाळप झालेल्या उसाला १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ॲार्डर १९६६ नुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करण्याचा सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत सांगितले. या चर्चेनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीChief Ministerमुख्यमंत्रीSugar factoryसाखर कारखाने