शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

राजाराम महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबत मुंबईत बैठक

By admin | Updated: July 6, 2015 00:31 IST

रवींद्र वायकर : राजारामपुरीतील नागरिकांना आश्वासन

कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसह इतर प्रश्नांबाबत मुंबईत लवकरच बैठक बोलावू, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शिष्टमंडळाला दिली. राजारामपुरी परिसर तालीम संस्था, तरुण मंडळ व ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने रविवारी शासकीय विश्रामगृह येथे वायकर यांची भेट घेऊन महाविद्यालयात प्रश्नांबाबत निवेदन दिले. राजाराम महाविद्यालय हे १३५ वर्षांचे जुने आहे. महाविद्यालयाची गुणवत्ता व शिस्त पाहता गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रवेशासाठी खूप गर्दी होत आहे; पण येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. इमारतीची कमतरता आहे, चार इमारती आहेत; पण त्यापैकी दोन अर्धवट आहेत. इमारतीचे मूळ अंदाजपत्रक ८.४४ कोटींचे असताना केवळ २.६८ कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे इमारतीचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. महाविद्यालयास ‘नॅक’चे मानांकन मिळण्यासाठी काही सुविधांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याची पूर्तता करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. राजारामपुरी परिसरातील विद्यार्थ्यांना १० टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. यावर बोलताना राज्यमंत्री वायकर म्हणाले, परिसरातील महाविद्यालय म्हणून प्रवेशाबाबत दुजाभाव करता येणार नाही. महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत बैठक घेऊ. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेविका संगीता देवेकर, प्रा. अनिल घाटगे, नितीन पाटील, अनिल कदम, साजीद खान, फिरोज सौदागर, नामदेव नलवडे, संजय काटकर, रवींद्र देसाई, विशाल पाटील, नितीन मोरे, चंद्रकांत दिंडे, आदी उपस्थित होते.