शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पोलीसपाटील मानधनाबाबत दोन दिवसांत बैठक : पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 3:39 AM

राज्यातील २७ हजार पोलीसपाटलांना गेल्या पाच महिन्यांत मानधन मिळाले नाही.

कोल्हापूर : राज्यातील पोलीसपाटील यांचे थकीत मानधन देण्यासाठी निधीची तरतूद करण्याबाबत येत्या दोन दिवसांत नियोजन व अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत मुंबईत बैठक आयोजित केली आहे. त्यातून पोलीसपाटील यांच्या मानधनाचा प्रश्न निकाली लागेल, असा विश्वास गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

राज्यातील २७ हजार पोलीसपाटलांना गेल्या पाच महिन्यांत मानधन मिळाले नाही. शासनाकडून मंजूर झालेल्या अनुदानापैकी सुमारे १०२ कोटींचा निधी आॅगस्टपर्यंत पोलीसपाटलांना वितरित झालेला आहे; पण फक्त १० टक्केच निधी शिल्लक राहिल्याने तो वाटायचा कसा? असा प्रश्न शासनासमोर आहे. ही परिस्थिती सत्य असल्याचे सांगून गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, पोलीसपाटील यांच्या मानधनामध्ये गेल्यावर्षी दुप्पट वाढ करण्यात आली. पण त्या प्रमाणात गतवेळच्या सरकारने निधीची वाढीव तरतूद केली नसल्याने मानधन वाटताना मंजूर निधी सहा महिन्यांतच संपला.पोलीसपाटील महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत नियोजन व अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत मंत्रालयात निधीबाबत बैठक आयोजित केली आहे.‘गृहरक्षक दलाच्या ५६ हजार जवानांवर बेकारीची कुºहाड’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. त्यावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, राज्यातील गृहरक्षक दलाच्या सर्व जवानांची सेवा निधीअभावी तात्पुरती थांबविली आहे. या जवानांचे सुमारे १२५ कोटी रुपये मानधन थकीत आहे. त्यापैकी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील सुमारे ५० कोटी रुपयांचे मानधन देण्यासाठीची तरतूद लवकरच करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस