शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

‘यूएलसी’च्या फाईलचा ‘अर्थपूर्ण’ प्रवास

By admin | Updated: September 3, 2015 23:58 IST

नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा : चिटपाखरू सापडले, बडी हस्ती सावध‘यूएलसी’च्या फाईलचा ‘अर्थपूर्ण’ प्रवास

तानाजी पोवार -कोल्हापूर--कमाल जमीन धारणा कायदा रद्द होऊन सुमारे एक दशक उलटले तरीही नागरिकांच्या अज्ञानामुळे यूएलसी कार्यालयात ‘मलिदा’ कमाविणाऱ्यांची टोळीच कार्यरत आहे. येथे हजारांत नव्हे तर लाखांत कसे व्यवहार चालतात. जुन्या मंजूर असलेल्या योजना कार्यान्वित करणाऱ्या ‘यूएलसी’ कार्यालयात या बहाद्दर अधिकाऱ्यांनी ‘दुकान’ थाटले आहे. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील यूएलसी कार्यालयापासून मुंबई मंत्रालयापर्यंत अशा ११ टेबलांवरही जमिनीच्या कामकाजाची ‘वजनदार’ फाईल प्रवास करते. या यूएलसी कार्यालयात लाच घेताना सापडलेले सहायक नगररचना अधिकारी समीर जगताप म्हणजे एक ‘चिटपाखरू’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यापेक्षा या कार्यालयातील ‘बडी मलिद्याची हस्ती’ या कारवाईपासून आता सावध झाली आहे.‘कमाल जमीन धारणा’ कायद्यातील पळवाटांमुळे खासगी जमिनी खासगी बिल्डरच्या घशात जात असल्याचे शासनाच्या लक्षात आले; त्यामुळे २००५ मध्ये शासनाने तो रद्द केला; पण त्यापूर्वी या जमिनी विकसित करण्यासाठी काही योजना मंजूर झाल्या होत्या. त्या एक वर्षात विकसित न केल्याने त्या योजनेबाबत माहिती देऊन त्या उर्वरित जागा विकसित करण्यासाठी ‘यूएलसी’ कार्यालय सुरू ठेवले. वर्षभरात न विकसित झालेल्या जमीनधारकांना प्रतिवर्षी दंडात्मक कारवाई केली जाते; पण २००५ ते २०१५ या दहा वर्षांत या कार्यालयातील अनेक अधिकारी ‘अर्थ’ शोधत गबर बनले. जमीनधारकांना ही जमीन वर्षभरात विकसित न केल्यास ती शासन आपल्या ताब्यात घेईल, अशी भीती दाखवून त्यावर मलिदा शोधणाऱ्यांची येथे साखळीच आहे.  विशेष म्हणजे, जमीन सोडवून घेण्यासाठी कारवाईच्या भीतीखाली हे गबर अधिकारी सांगतील ती रक्कम मोजण्यास जमीनधारक तयार होतो. या मलिद्यासाठी या कार्यालयात तिघांची साखळी प्रचलित झाली आहे. येथे असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला जमीनप्रकरणी एखाद्याने दूरध्वनी केल्यास त्या जमिनीची माहिती, त्यासाठी येणारा खर्च, योजनेचा फाईल नंबर अशी माहिती त्या बाईसाहेब पटकन सांगतात. नव्हे, ती त्यांच्या डोक्यातच फिट झाली आहे! त्यानंतर आणखी एका टेबलावर फाईल फिरून ती जगताप महाशयांकडे येते. त्यामुळे या तिन्हीही टेबलांवर ‘अर्थ’ शोधण्याचे काम मोठ्या प्रमाणात होते. एकदा ‘अर्थ’ शोधण्याचे काम झाले की, जमिनीच्या फाईलमधील कागदपत्रांतील त्रुटी आपोआपच बाजूला करून ती फाईल ‘कायदेशीरदृष्ट्या परिपूर्ण’ करण्यात साहेबांचा हातखंडाच आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा ‘मलिदा’ द्यावा लागतो, असे सांगून जमीनधारकाला लुबाडण्याची जणू प्रथाच पडली आहे. त्यानंतरही फाईल प्रांत कार्यालय व त्यानंतर ती मंत्रालयात नगररचना विभागाच्या शिक्कामोर्तबासाठी जाते. या दरम्यानच्या सुमारे ११ टेबलांवर प्रत्येक वजनदार फाईलनुसार ‘अर्थ’ शोधला जातो. त्यामुळे हे कार्यालय म्हणजे ‘कुरण’च म्हणावे लागते.‘ना हरकती’साठी हेळसांडही जमीन ‘कमाल जमीन धारणा’ कायद्याखाली नाही, यासाठी ‘ना हरकत दाखला’ घेण्यासाठी महापालिकेच्या नगररचना कार्यालयाचीही मंजुरी लागते. हा कायदा रद्द झाला असला तरी संबंधित फाईल महापालिकेत गेल्यावर ‘ही जमीन यूएलसी कायद्याखाली येत नसल्या’चा ना हरकत दाखला आणावा, असे सांगितले जाते. त्यामुळे जमीनधारक पुन्हा यूएलसी कार्यालयात जातात; पण तेथेही पुन्हा ‘अर्थ’ शोधण्यासाठी ही प्रकरणे रेंगाळत ठेवली जातात. अशा प्रकरणांच्या फायलींचा ढीग दिवसेंदिवस वाढतच आहे.