शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मगदूम हायस्कूलमध्ये ‘मी सुद्धा गाडगेबाबा’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:26 IST

कोल्हापूर : श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षक प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब अ. मगदूम हायस्कूलमध्ये लोकसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त ...

कोल्हापूर : श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षक प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब अ. मगदूम हायस्कूलमध्ये लोकसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त ‘मी सुद्धा गाडगेबाबा’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. उपक्रमाची सुरुवात नीळकंठराव लोकरे यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. गाडगेबाबांच्या जीवनकार्याचा विस्तृत परिचय सहाय्यक शिक्षिका रंजना माळी यांनी करून दिला.

याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे नीळकंठराव लोकरे यांनी ‘विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त व स्वावलंबन या तत्त्वांचा अंगीकार करत स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी ओळख निर्माण करावी तसेच गाडगेबाबांचे थोर विचार सर्वांनी आत्मसात करून समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो याची जाणीव ठेवून वर्तन करावे’ असे प्रतिपादन केले.

‘गाडगेबाबांनी अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन कीर्तनसारखे प्रभावी माध्यम वापरून समाजहिताचे व समाजसुधारणेचे बहुमोल कार्य केले. त्याप्रमाणे आपल्या हातूनसुद्धा योग्य समाजकार्य घडणे अपेक्षित आहे’ असे प्रतिपादन अध्यक्षस्थानी बोलताना मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद यांनी केले. ‘मी सुद्धा गाडगेबाबा’ या उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेबाबत प्रबोधन व जाणीव जागृती करण्यात आली. दररोज स्वत:चे घर, शाळा व परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प विद्यार्थांनी केला व त्याचे पहिले पाऊल म्हणून शालेय वर्ग व परिसर विद्यार्थांनी श्रमदानातून स्वच्छ केला.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख महावीर तेरदाळे व आभार प्रदर्शन दत्ता पालकर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

————————————

फोटो ओळ (23देशमुख हायस्कूल)

लोकसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करताना नीळकंठराव लोकरे. शेजारी डावीकडून महावीर तेरदाळे, मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद, नीता लोकरे, रंजना माळी.