शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 1:59 PM

Martyr Rishikesh Jondhale News :

- रवींद्र येसादे  

कोल्हापूर -  बहिरेवाडी ता. आजरा. येथील ग्रामस्थ गेले दोन दिवस वाट पाहत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण आलेले जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे यांचे पार्थिव गावात सहा वाजून चाळीस मिनिटांनी आले. अन् आश्वांचा बांध फुटला, अलोट गर्दीने वीर जवान यांना आदरांजली वाहण्यात आल्यानंतर शासकीय इतमामातं अंत्यसंस्कार करण्यात आले.वीर जवान जोंधळे यांचे पार्थिव पुणे येथून सकाळी साडेसहा वाजता आल्यानंतर  डॉ.जे. पी. नाईक स्मारकावर जवळ लष्कराच्या गाडीतून उतरण्यात आले.तेथून जवानांनी पार्थिव  जोंधळे यांच्या घराकडे नेत असताना रस्त्यांच्या दुर्तफा फुलांचा वर्षाव करीत ग्रामस्थांनी  आदरांजंली वाहिली. पार्थिव घरी आल्यानंतर वडील, आई , बहिण यांचा आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.

घरी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरवरून ठेवून  मिरविणूकीने अंत्यसंस्कारासाठी भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानावर पार्थिव नेण्यात आले. आपल्या लाडक्या मुलाचे मुख दर्शन वडील आई , वडील , बहिण यांनी घेतले . त्यानंतर सैन्यदल, कोल्हापूर पोलिस यांनी मानवंदना दिल्यानंतर पार्थिवावर कर्नल विनोद पाटील , गृहराज्यमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , खासदार संजय मंडलिक , जिल्हाधिकारी दौलत देसाई , जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे , अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड , तहसिलदार विकास अहिर  , उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे ,आम. राजेश पाटील , समरजित घाटगे , जि.प. सदस्य उमेश आपटे , प. स. सदस्य शिरीष देसाई , वसंत धुरे , सरपंच अनिल च०हाण , सुरेश खोत , चंद्रकांत गोरुले , आजी - माजी सैनिक संघटना आदींनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली .भाऊ कुंडलिक जोंधळे यांनी पार्थिवास भडाग्नी दिली . त्यानंतर कोल्हापूर पोलिस , मराठा सहा लाईफ इंन्फंट्री बटालियन बेळगाव यांनी अखेरची मानवंदना दिली. अलोट गर्दी अन् स्वंय शिस्त !पार्थिव गावात आल्यापासून अत्यसंस्कार होईपर्यंत परिसरातील ग्रामस्थांनी स्वंयशिस्त पाळली . अलोट अशी गर्दी होती . ग्रामस्थांच्या अवाहनाला प्रतिसाद देत मास्कचा वापर सर्वांनी केला होता ,. राज्य सरकार शहिद जवानांचा पाठीशी बहिरेवाडीकरांनी उमेद तरुण देशसेवेसाठी गमवला. राज्य शासन जोंधळे परिवाराच्या पाठीशी आहे. शहीद जवान जोंधळे यांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही.-   गृहराज्यमंत्री   सतेज पाटील  एक पणती शहीद जवानासाठी लावूया ऋषिकेश याला मी जवळून ओळखतो. त्याचे देशासाठी केलेले योगदान बहिरेवाडीकर विसरणार नाहीत. दुःख सावरण्यासाठी कुटुंबीयांना परमेश्वर शक्ती देवो. दिवाळीनिमित्त एक पणती जवानांसाठी लावूया.             हसन मुश्रीफ - ग्रामविकास मंत्री

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र