सोळांकूर : सोळांकूर ( ता. राधानगरी) येथील सानिका गणेश पोतदार (वय २२) या विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. प्रसूती सिझेरीनद्वारे करून तिने स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला. यानंतर काही वेळात तिची प्रकृती खालावली दरम्यान तिला व्हेंटिलेटरवर ठेवून रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालय कोल्हापूर याठिकाणी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. परंतु नातेवाईक व ग्रामस्थांनी सोळांकूर येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सानिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले. डॉक्टरांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाइकांनी पवित्रा घेतला आहे. वैद्यकीय अधिकारी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही शुक्रवारी सकाळी रुग्णालयावर मोर्चा नेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.विवाहितेचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच रात्री सोळांकूर ग्रामीण रुग्णालय येथे नातेवाईक व ग्रामस्थांनी डॉक्टरांना घेराव घालून विवाहितेचा मृत्यू हा येथेच उपचारादरम्यान हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला. दोषींवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा नातेवाइकासह शिवानंद महाजन, विकास पाटील, अरविंद निचीते, रावसाहेब पानारी, संजय कांबळे, रणजित मुधोळकर, संजय परीट, दिनेश पाटील,मिथुन पानारी, संकेत कदम, अनिल पानारी, मिलिंद कुंभार आदिंसह ग्रामस्थांनी घेतला.मुलगी मातृत्वास मुकलीसानिकाचा विवाह चार वर्षांपूर्वी गणेश पोतदार याच्याशी झाला होता.तिचे पहिले बाळ पोटातच सात महिन्याचे असताना दगावले होते. दुसरा मुलगा अडीच वर्षांचा आहे. आज जन्मलेली नवजात मुलगी केवळ एक दिवसाची असून ती जन्मताच मातृत्वाला मुकली आहे.याबद्दल नातेवाईक व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे
निष्काळजीपणामुळे विवाहितेचा मृत्यूप्रस्तुतीसाठी आलेल्या सानिका पोतदार या महिलेचा अपघाती मृत्यू नसून रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला आहे. असा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांनी केला आहे. याचबरोबर रुग्णाचा मृत्यू झाल्यावर तिला कोल्हापूरला पाठवण्यात आल्याचा आरोप ही ग्रामस्थांनी केला आहे. आरोग्य सेवेत आवश्यक साधने आणि व्यवस्था असताना उपचारांमध्ये घाई का करण्यात आली? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला.
सानिका पोतदार रुग्णालयात प्रसूतीसाठी बुधवारी दाखल झाली. तिची दुसरी प्रसूती सर्वसाधारण झाल्यामुळे प्रसूतीसाठी सर्वसाधारण होण्यासाठी आमच्या टीमने प्रयत्न केले. पण ती न झालेमुळे सिझेरीन करण्याचा निर्णय घेतला. प्रसूती व्यवस्थित होऊन बाळ सुखरूप जन्मले. दरम्यान गर्भाशयात साठलेले पाणी रक्तवाहिनीतून ह्रदय व फुफ्फुसामध्ये गुठळ्या झाल्या व श्वासोच्छ्वास गुदमरून विवाहितेचा मृत्यू झाला. - डॉ ज्योती कोल्हे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सोळांकूर
Web Summary : A woman died post-delivery in Solankur, sparking outrage. Relatives allege negligence, demanding action against the doctors. Villagers plan a protest, refusing to claim the body until justice is served. The deceased leaves behind a newborn daughter.
Web Summary : सोलांकुर में प्रसूति के बाद एक महिला की मौत हो गई, जिससे आक्रोश फैल गया। परिजनों ने लापरवाही का आरोप लगाते हुए डॉक्टरों के खिलाफ कार्रवाई की मांग की। ग्रामीणों ने विरोध प्रदर्शन की योजना बनाई, और न्याय मिलने तक शव लेने से इनकार कर दिया। मृतका एक नवजात बेटी को छोड़ गई।