शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

...तर आरक्षणासाठी मुंबईची कोंडी करणार ४ सप्टेंबरला ‘गाडी मार्च’ : सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:56 IST

या महिनाअखेर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा न केल्यास ५ सप्टेंबर रोजी मुंबईला धडक मारण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

कोल्हापूर : या महिनाअखेर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा न केल्यास ५ सप्टेंबर रोजी मुंबईला धडक मारण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. हजारो चारचाकी वाहने आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत जाऊन तेथे शहराचीच कोंडी केल्याशिवाय सरकार जागे होणार नाही; म्हणूनच हा ‘गाडी मार्च’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील विविध संघटना, कार्यकर्त्यांच्या येथे झालेल्या दिवसभराच्या बैठकीनंतर बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री विशेष अधिवेशन घेणार, असे सर्वत्र सांगत आहेत. त्यांनी ३१ आॅगस्टच्या आत ही तारीख जाहीर करावी. आमच्या मागण्यांबद्दल अधिवेशनामध्ये चर्चा व्हावी, मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी आर्थिक तरतूद काय केली हे सांगावे. अन्यथा ४ सप्टेंबरला कोल्हापुरातील दसरा चौकातून मुंबईकडे ‘गाडी मार्च’ निघेल.

या मार्चदरम्यान कार्यकर्ते विविध जिल्ह्यांतील हजारो गाड्या घेऊन सहभागी होणार आहेत. मात्र, मुंबईत आम्हांला अडविल्यास बेमुदत आंदोलन सुरू करणार आहोत. जर आरक्षण देणे जमणार नसेल तर आम्ही नालायक आहोत, असे सांगून सरकारने पायउतार व्हावे.शासनाच्या भूमिकेबाबत सावंत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे दोन महिन्यांपूर्वी हे प्रकरण न्यायालयात आहे, असे सांगत होते. परळी, कोल्हापूर येथे आंदोलने सुर झाल्यानंतर राज्य मागासवर्गीय अहवालाचे कारण पुढे करण्यात आले. मात्र आरक्षण कसे देणार आहे, हे अजूनही या दोघांनीही सांगितलेले नाही.

वसंतराव मुळीक म्हणाले, जरी आम्ही मुंबईला आंदोलनासाठी गेलो तरी दसरा चौकातील आंदोलन आमच्या मराठमोळ्या महिला नेटाने पुढे चालविणार आहेत. १000 गाड्या आत्ताच तयार असल्याचे हर्षल सुर्वे यांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान मंत्रालयाला घेराव घालावा, स्टॉक एक्स्चेंजचे काम बंद पाडावे, अशा सूचना कार्यकर्त्यांनी बैठकीत केल्या. यावेळी चंद्रकांत पाटील, प्रज्ञा जाधव, मुंबई; प्रवीण पाटील, सांगली, प्रा. नानासाहेब धाटे, कर्जत, अहमदनगर; निखिल जाधव, सातारा, प्रवीण जाधव, वाई यांच्यासह कोल्हापूरचे कार्यकर्ते उपस्थित होते.इतर मागास कोट्यातूनच आरक्षण हवेसावंत म्हणाले, आम्हीही आता अभ्यास केला आहे. गुज्जर, जाट यांचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही; त्यामुळे मराठा समाजाला इतर मागास कोट्यामधूनच आरक्षण दिले तरच ते टिकू शकते. तेव्हा याच पद्धतीने आम्हाला आरक्षण पाहिजे. आता तहात हरण्याची आमची मन:स्थिती नाही.‘गेटवे आॅफ इंडिया’वर ठिय्या आंदोलनदिलीप देसाई म्हणाले, गेटवे आॅफ इंडियावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवरायांना वंदन करून आम्ही तेथे बसणार आहोत. शासन ऐकत नसल्याने मराठा आरक्षणाबाबत ग्रामपंचायतींनी केलेले सर्व ठराव आम्ही समुद्राला अर्पण करणार आहोत.श्रीमंत शाहू महाराजांची गाडी पहिलीमुंबईकडे जाणाऱ्या मार्चमध्ये माझी गाडी सर्वांत पुढे असेल, असा शब्द श्रीमंत शाहू महाराजांनी आम्हाला दिल्याचे यावेळी इंद्रजित सावंत यांनी सांगितले. याच पद्धतीने आता भाषणे करणाºया सर्वच नेत्यांनी आपल्या गाड्या मार्चच्या पुढे लावाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा