शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

माझ्या आईसाठी मी मराठीतच बोलीन...; हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 17:10 IST

‘मी मराठीतच बोलीन...’ अशी प्रतिज्ञा येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी घेतली. ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त ‘लोकमत’च्या वतीने गुरुवारी पेटाळा मैदानावर हा उपक्रम राबविण्यात आला. एस. एम. लोहिया, न्यू हायस्कूल, न्यू हायस्कूल मराठी शाखा येथील सुमारे ३५०० विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या उपक्रमात अत्यंत उत्साहाने सहभागी झाले.

ठळक मुद्देमराठी राजभाषा दिन विशेष : माझ्या आईसाठी मी मराठीतच बोलीन...!! लोकमत’चा उपक्रम :कोल्हापुरात ३५०० विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा

कोल्हापूर : ‘मी मराठीतच बोलीन...’ अशी प्रतिज्ञा येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी घेतली. ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त ‘लोकमत’च्या वतीने गुरुवारी पेटाळा मैदानावर हा उपक्रम राबविण्यात आला. एस. एम. लोहिया, न्यू हायस्कूल, न्यू हायस्कूल मराठी शाखा येथील सुमारे ३५०० विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या उपक्रमात अत्यंत उत्साहाने सहभागी झाले.मराठी भाषेचा वापर सर्वांनी करावा, आपली मातृभाषा अधिक समृध्द व्हावी यासाठी ‘लोकमत’ने मराठी बोला ना.. ही मोहिम हाती घेतली आहे. त्याचा भाग म्हणून मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत गुरुवारी शालेय विद्यार्थ्यांना नेहमी मराठी भाषेतच संवाद साधवा यासाठी ‘मी मराठीत बोलीन...’ अशी प्रतिज्ञा देण्यात आली.एस. एम. लोहिया हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस.एस. चव्हाण म्हणाले,‘ खऱ्या अर्थाने मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा असून ती सर्वांनी जपली पाहिजे. मधल्या काळात समाजमाध्यमांमुळे मराठी भाषा लोप पावते काय, अशी भीती व्यक्त केली जात होती; परंतु असे झाले नाही. या उलट समाजमाध्यमांवरच मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. शासनानेही आता मराठी भाषा सक्तीची केली असून, ही आनंदाची बाब आहे.’एस. एम. लोहिया हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस. एस. चव्हाण यांनी सर्वांना प्रतिज्ञा दिली. आर. आय. पोवार, आर. जी. देशपांडे, बी. एस. चोपदार, एस. पी. कुलकर्णी, एस. ए. शिंदे, न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक के. ई. पोवार, सयाजी पाटील, एच. बी. खानविलकर, प्रदीप पोवार, व्ही. बी. पाटील, वाय. एस. पोवार, न्यू हायस्कूल मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुलभा कांबळे, शिक्षक स्नेहल रेळेकर, कैलास भोईटे, दशरथ कुंभार, चारूशीला पाटील, ऊर्मिला ओमासे यांनी विद्यार्थ्यांसह मराठीत बोलण्याची प्रतिज्ञा घेतली.

मराठी भाषा मला आईसारखी असून व्यवहारात याच भाषेत बोलले पाहिजे. मातृभाषा असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांनी तिचा वापर केला पाहिजे. या संदर्भात जनजागृती करण्याचा ‘लोकमत’चा हा उपक्रम कौतुकास पात्र आहे.वरद कोकारे, नववी

मराठीसोबत हिंदी, इंग्रजी अशा सर्व भाषांचे शिक्षण घेतले पाहिजे. मात्र, आपण ज्या राज्यात राहतो, त्या राज्याच्या मातृभाषेतच बोलणे योग्य आहे. रोजचा संवाद हा मराठीतच झाला पाहिजे.- सुमेध कुलकर्णी, नववी

प्रतिज्ञामी मराठीत बोलीनएकमेकांशी बोलतानाभाजी विकत घेतानामी मराठीत बोलीनसवय म्हणूनआवड म्हणूनभाषेवर प्रेम म्हणूनमाझी निवड म्हणूनमी मराठीत बोलीनमाझ्या भाषेच्या भविष्यासाठीमाझ्या परंपरांना जपण्यासाठीमराठीसाठीमाझ्या आईसाठीपण सर्वांत जास्तमाझ्यासाठीमी मराठीत बोलीन 

 

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनkolhapurकोल्हापूरLokmat Eventलोकमत इव्हेंट