शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Maratha Reservation : मागण्यांची पूर्तता झाल्यास नाशिकमध्ये विजयोत्सव : खासदार संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:08 PM

Sambhaji Raje Chhatrapati Maratha Reservation : कोल्हापूरनंतर आता नाशिकमध्ये ३१ जूनला मूक आंदोलन करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वी आम्ही मांडलेल्या मागण्यांची पूर्तता सरकारकडून झाल्यास नाशिकमध्ये आंदोलनाऐवजी विजयोत्सव साजरा करण्यात येईल, असे खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी येथे सांगितले.

ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता झाल्यास नाशिकमध्ये विजयोत्सव : खासदार संभाजीराजेराज्य सरकारच्या भूमिकेचे स्वागत, तयारी करून चर्चेसाठी जाणार

कोल्हापूरकोल्हापूरनंतर आता नाशिकमध्ये ३१ जूनला मूक आंदोलन करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वी आम्ही मांडलेल्या मागण्यांची पूर्तता सरकारकडून झाल्यास नाशिकमध्ये आंदोलनाऐवजी विजयोत्सव साजरा करण्यात येईल, असे खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी येथे सांगितले.

सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिल्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींसमवेत चर्चा करण्यासाठी मराठा समाजातील अभ्यासू समन्वयक, तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही तयारी करून जाणार आहोत.

आम्ही मांडलेल्या आरक्षणासह पाच मागण्यांच्या पूर्ततेबाबत राज्य सरकारकडून ६ जूनपर्यंत निर्णय झाला नसल्याने मराठा समाजाला कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळी मूक आंदोलन करावे लागले. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन आपली भूमिका मांडली.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारच्यावतीने मला मुंबईत मराठा समाजाच्या पाच मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींसमवेतच्या चर्चेसाठी गुरुवारी येण्याचे निमंत्रण दिले, त्याचे स्वागत करतो. चर्चेला बोलविले याचा अर्थ आम्ही समाधानी झालो असा नाही, या चर्चेसाठी गुरुवारी जाणे आम्हाला शक्य होणार नाही. कारण, आम्ही तयारी करून जाणार आहोत.

चर्चेसाठी कधी जायचे याचा निर्णय लवकर घेतला जाईल. या चर्चेतून काय निष्पन्न होणार, हे आम्ही सर्व समन्वयक बघणार आहोत. जर आमच्या मागण्या रास्त पद्धतीने सरकार निकाली लावणार असतील तर त्याचे स्वागत केले जाईल. मात्र, मूक आंदोलनाचे आमचे नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण हे टप्पे ठरले आहेत. पण, मला असा विश्वास वाटतो की, जर सरकारने सर्व प्रश्न मार्गी लावले, मागण्या मान्य केल्यास पुढे मूक आंदोलन राहणार नाही. नाशिकमध्ये आम्ही विजयोत्सव साजरा करू, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर