शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

Maratha Reservation : दसरा चौकात आंदोलन स्नेहभाव मिलाफ, मुस्लिम बांधवांना बांधल्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:29 AM

आंदोलन आणि स्नेहभाव यांचा मिलाफ  दसरा चौकातील मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी दिसून आला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनी कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून हिंदू-मुस्लिम ऐक्याची कोल्हापूरची परंपरा जपली.

ठळक मुद्देजिजाऊ ब्रिगेडच्या भगिनींनी मुस्लिम बांधवांना बांधल्या राख्यामराठा आरक्षण : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

कोल्हापूर : आंदोलन आणि स्नेहभाव यांचा मिलाफ  दसरा चौकातील मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी दिसून आला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनी कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून हिंदू-मुस्लिम ऐक्याची कोल्हापूरची परंपरा जपली.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी कोल्हापुरात दसरा चौकात गेले महिनाभर ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलने सुरू आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात मुस्लिम बांधवांचे नेहमीच मोलाचे योगदान लाभले आहे. त्यांच्या कार्याची दखल राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनींनी घेतली.

रविवारी आंदोलन आणि स्नेहभावाचे ऋणानुबंध समाजासमोर दिसून आले. गेले ३० दिवस ज्या व्यासपीठावर रक्षाबंधनाचे औचित्य साधून हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे दर्शन घडविले.

यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, मुनाफ देसाई यांच्यासह आजरा (ता. शिरोळ) येथील मुस्लिम सुन्नत जमात आलासचे गौस साहेबदाणे, इकबाल पटेल, चाँदपाशा पाटील, इरफान पटेल, फतेहअली पाटील, फारुक देसाई, आदींना राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनंदा चव्हाण, सीमा सरनोबत, मीना नलवडे, सारिका पाटील, वैशाली जाधव, आयेशा खान, चारूशीला पाटील, अलका देवाळकर, राणी देसाई, रंजना पाटील, जयश्री जाधव, आदी भगिनींनी ओवाळून रक्षाबंधनांचा सण साजरा केला.

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आता मुलांनीही आंदोलनात उडी घेतली. या मुलांनी कोल्हापुरातील शिवाजी चौकातील शौर्यपीठावर हातात पाटी घेऊन ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदविला. (छाया : नसीर अत्तार) 

शिवाजी चौकात चिमुकल्यांची घुमली सादज्या भावी पिढीला आरक्षणाचा लाभ मिळेल, अशा चिमुकल्यांंनी शिवाजी चौकातील शौर्यपीठावरून ‘आरक्षण आमच्या गरजेचे’ अशी एकसाथ आरोळी ठोकत आरक्षण आंदोलनात उडी घेतली. डोक्यावर भगव्या टोप्या घालून, हातात मराठा आरक्षणाच्या मागणीची पाटी घेऊन या मुलांनी व्यासपीठावरून घोषणा दिल्या.

‘एक मराठा - लाख मराठा,’ ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणा देत ही सुमारे ५ ते १२ वयोगटातील मुले या ठिय्या आंदोलनात सहभागी झाली होती. यापैकी अद्वैत जाधव या मुलाने आपल्या रोखठोक भाषेत मराठा आरक्षणाबाबत भाषण दिले.

शौर्यपीठावर एका बहिणीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून आपल्या भावाला राखी बांधून ओवाळणी ‘मराठा आरक्षण मिळवून दे,’ अशी भावनिक साद घातली. या व्यासपीठावर राजे मेवेकर, काका धर्माधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांसह छत्रपती ग्रुपचे ऋतुराज सरनोबत, राज मेवेकरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग दर्शवून पाठिंबा दिला.

मराठा आरक्षणप्रश्नी शौर्यपीठाच्या कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजे यांची सातारा येथे भेट घेऊन त्यांना कोल्हापुरात येऊन ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. (छाया : नसीर अत्तार)

उदयनराजेंना निमंत्रणशौर्यपीठाच्या वतीने आंदोलकांनी खासदार उदयनराजे यांची शनिवारी रात्री सातारा येथे भेट घेऊन त्यांना कोल्हापूरला येण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून, लवकरच कोल्हापूरला मराठा आरक्षणबाबत रोखठोक भूमिका मांडण्यासाठी कोल्हापूरला येण्याचे मान्य केले. यावेळी जयदीप शेळके, उदय लाड, शिवाजीराव लोंढे, राजेंद्र चव्हाण, दादासो देसाई, अक्षय धामणे, जनार्दन पाटील, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर