शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससह शिंदेसेना, भाजपमध्येही बंडाळी सुरु; अक्षय जरग, राहुल चव्हाण, रामुगडे अपक्ष; संदीप नेजदार नॉटरिचेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:08 IST

माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी काँग्रेसमार्गे भाजप करत सोमवारी शिंदेसेनेत प्रवेश केला

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारीचा पत्ता कट झाल्याने आता अनेकांनी बंडखोरी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेससह शिंदेसेना आणि भाजपमध्येही बंडाळी सुरु झाल्याने ती शमविण्यासाठी नेत्यांच्या नाकीनव आले आहे.प्रभाग क्रमांक १० मधून काँग्रेसकडून इच्छुक असलेले अक्षय विक्रम जरग यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी सोमवारी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरीचे निशाण फडकविले. दुसरीकडे प्रभाग क्रमांक १ मधून काँग्रेसने उमेदवारी नाकारलेले माजी नगरसेवक डॉ. संदीप नेजदार सोमवारी नॉटरिचेबल राहिल्याने शंका-कुशंकाने चांगलेच पेव फुटले.महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधील सर्वसाधारण जागेवर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले व काँग्रेसचे कार्यकर्ते अक्षय जरग या दोघांनीही दावा सांगितला होता. अखेर ही जागा महाविकास आघाडीत उद्धवसेनेला गेल्याने जरग यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. जरग यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीत पहिली बंडखोरी झाल्याचे मानले जाते. दरम्यान, प्रभाग क्रमांक १ मध्ये माजी नगरसेवक संदीप नेजदार यांच्यासह सचिन चौगले यांचे नाव चर्चेत होते. काँग्रेसने सचिन चौगले यांच्या पारड्यात आपले वजन टाकल्याने नेजदार यांना यंदा थांबावे लागणार आहे. डॉ. नेजदार यांना उमेदवारी नाकारल्यानंतर डॉ. नेजदार व पूर्वाश्रमीचे त्यांचे सहकारी शिंदेसेनेचे शारंगधर देशमुख यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, हे फोटो फेक असल्याचा दावा नेजदार सर्मथकांकडून करण्यात आला. दरम्यान, शिंदेसेनेचे एकमेव माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांचा पत्ता कापल्याने त्यांनी अपक्ष मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.

अशोक जाधव शिंदेसेनेतमाजी नगरसेवक अशोक जाधव यांनी काँग्रेसमार्गे भाजप करत सोमवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. जाधव यांचे पुत्र अजिंक्य जाधव प्रभाग पाचमधून उमेदवारीसाठी इच्छुक होते. प्रभाग १ मधून त्यांच्या पत्नीचेही नाव चर्चेत होते.

रामुगडेंची बंडखोरीभाजपचे माजी नगरसेवक सुभाष रामुगडे हे प्रभाग क्रमांक १९ मधून भाजपकडून इच्छुक होते. मात्र, त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.

बीडकर राष्ट्रवादीतउद्धवसेनेचे उपशहर प्रमुख शशिकांत बीडकर यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून, तेथून ते उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत.

प्रभाग क्रमांक १० मध्ये सर्वसाधारण जागेवर उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीत ही जागा उद्धवसेनेला गेल्याने मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. - अक्षय जरग, उमेदवार, प्रभाग क्रमांक १० कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Rebellion in Kolhapur: Congress, Shiv Sena, BJP face internal strife

Web Summary : Kolhapur's municipal elections see rebellion as candidates denied tickets. Congress, Shiv Sena, and BJP face internal strife. Akshay Jarag, Rahul Chavan, and Subhash Ramugade contest independently. Sandeep Nejdar is unreachable. Ashok Jadhav joins Shiv Sena; Shashikant Bidkar joins NCP.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा