शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: दारू तस्करी, अटकेतील ढेरे याचे अनेक कारनामे, तपासासाठी स्वतंत्र पथक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:13 IST

सोशल मीडियात अधिकाऱ्यांसोबत फोटो

कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी असल्याचे भासवून अंबर दिव्याच्या कारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, कोल्हापूर) याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. सोशल मीडियात त्याचे उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांसोबत अनेक फोटो आहेत.

त्याने काही अधिकाऱ्यांसाठी दारू विक्रेत्यांकडून वसुलीचे काम केल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्याच्यासह दुसरा संशयित आरोपी शिवाजी आनंदा धायगुडे (५७, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.तस्करीतील कारच्या फास्टॅगवर काळा कागद लावला होता. याचा अर्थ त्याने टोल टाळण्यासाठी शासकीय कर्मचारी असल्याचे बनावट ओळखपत्र तयार केल्याचा संशय आहे. गोव्यातून आणलेला अडीच लाखांचा दारूसाठा तो सैन्य दलातील निवृत्त जवान शिवाजी धायगुडे यांना देणार होता. नेसरी ते गडहिंग्लज मार्गावर महागाव येथे धायगुडे यांच्या कारमध्ये दारूचे बॉक्स भरण्यापूर्वीच तो भरारी पथकाच्या हाती लागला.

कारवाईची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी त्याची कार रस्त्यावरून खाली घसरून झुडपात अडकल्याने कारच्या काचा फुटल्या. त्याने काही अधिकाऱ्यांसाठी पंटर म्हणून काम केल्याची चर्चा आहे. कोरोना काळात त्याने जाधववाडी आणि विक्रमनगर येथे लाखो रुपयांची दारू विकली होती. त्याच्या चौकशीसाठी स्वतंत्र पथक तयार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मित्राची कार भाड्याने घेतलीढेरे याने दारू तस्करीसाठी सचिन डकरे (रा. जाधववाडी) याची आलिशान कार भाड्याने घेतली होती. दुसरी कार अटकेतील शिवाजी धायगुडे याच्या मालकीची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन दिवसांत काय तपास झाला?संशयितांना अटक केल्यापासून दोन दिवसांचा अवधी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाला. या काळात केवळ संशयितांकडील वाहनांची माहिती काढण्यात अधिकाऱ्यांना यश आले. दारूसाठा कोणाला पोहाेचवायचा होता?, तो कोणाकडून आणला? ढेरे याने शासकीय गणवेश कोणाकडून घेतला? अंबर दिवा कोणाकडे मिळाला? तो गेल्या दोन दिवसांपासून मोबाइलवरून कोणाच्या संपर्कात होता? याची माहिती अद्याप अधिकाऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे तपासाच्या गतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षभरातील कारवाया

  • एकूण गुन्हे - २२५७
  • अटक आरोपी - २१५२
  • वाहने जप्त - १६९
  • देशी दारू - ४ हजार २२१ लिटर
  • हातभट्टी - ३७ हजार ६९ लिटर
  • विदेशी दारू - १४ हजार १८८ लिटर
  • जप्त मुद्देमालाची किंमत - ६ कोटी २० लाख ६५ हजार ७३४ रुपये
  • जप्त वाहनांची किंमत - २ कोटी ३२ लाख २६ हजार २१० रुपये
टॅग्स :kolhapurकोल्हापूरExcise Departmentउत्पादन शुल्क विभागCrime Newsगुन्हेगारी