शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

गणेशउत्सव साजरा न करण्याचा २० गावातील मंडळांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:50 IST

कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव विचार घेता कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २० गावातील गणेश मंडळानी सार्वजनिक गणेशउत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देगणेशउत्सव साजरा न करण्याचा २० गावातील मंडळांचा निर्णय कोडोली येथे गणेशउत्सव संदर्भात बैठक, मंडळाचा सामिश्र प्रतिसाद

कोडोली : कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव विचार घेता कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २० गावातील गणेश मंडळानी सार्वजनिक गणेशउत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अनुकरण कोडोलीतील गणेश मंडळानी करावे असे आवाहन कोडोली पोलिस ठाण्याचे सपोनि सुरज बनसोडे यांनी केले. या आवाहनास येथील मंडळाचा सामिश्र प्रतिसाद मिळाला.यावेळी काही मंडळानी यावर्षीपुरते उत्सव साजरा करणार नसल्याचे तर काही मंडळानी गणेशोत्सव साधेपणाने व शासकीय नियमाचे पालन करीत साजरा करणार असल्याचे सांगितले.

कोडोली पोलीस ठाणे व ग्रामपंचायतीच्या वतीने हौसिंग सोसायटीच्या सभागृहात सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच शंकर पाटील होते.येथे शंभरहून अधिक गणेश मंडळे आहेत. यावेळी सपोनि सुरज बनसोडे यांनी कोडोलीत कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाने घालून दिलेले नियम सांगत २० गावातील मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे सांगितले. त्याचे अनुकरण कोडोलीतील मंडळांनी करावे असे आवाहन केले.

यावेळी श्री ची स्थापना करणे ही मंडळांची परपंरा असल्याने गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे विचार मांडले. शासकीय नियमानुसार गणेश मूर्तीची उंची, सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन, उत्सव काळात कोणतीही सजावट न करता तसेच मिरवणूक न काढता साधेपणाने उत्सव साजरा करू असे आश्वासन कार्यकर्त्यानी यावेळी दिले.मडळांनी धर्मादाय आयुक्त, पोलिस स्टेशन यांची परवानगी घ्यावी व त्यासाठी ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन सरपंच शंकर पाटील यांनी दिले. यावेळी माजी सरपंच नितीन कापरे, माजी उपसरपंच निखिल पाटील, प्रवीण जाधव यांच्यासह मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच कुंभार समाजातील बांधव मोठया प्रमाणावर उपस्थित होते. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवPolice Stationपोलीस ठाणेkolhapurकोल्हापूर