शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

अन् बँकेच्या व्यवस्थापकाला आयुक्तांनी खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 19:10 IST

CoronaVirus Banking Kolhapur : दसरा चौकातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या दारात सोशल डिस्टन्सिंग न पाळता ग्राहकांनी गर्दी केली होती. यादरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे या आपल्या वाहनातून जात होत्या. त्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर तत्काळ थांबून बँकेच्या दारात गेल्या आणि त्यांनी व्यवस्थापकास बाहेर बोलावून ग्राहकांची व्यवस्था नीट न केल्याबद्दल चांगलेच सुनावले.

ठळक मुद्देअन् बँकेच्या व्यवस्थापकाला आयुक्तांनी खडसावले दसरा चौकातील प्रकार : बँकेच्या बाहेर ग्राहकांचा घोळका

कोल्हापूर : दसरा चौकातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या दारात सोशल डिस्टन्सिंग न पाळता ग्राहकांनी गर्दी केली होती. यादरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे या आपल्या वाहनातून जात होत्या. त्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर तत्काळ थांबून बँकेच्या दारात गेल्या आणि त्यांनी व्यवस्थापकास बाहेर बोलावून ग्राहकांची व्यवस्था नीट न केल्याबद्दल चांगलेच सुनावले.शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे कामानिमित्त आपल्या वाहनातून दसरा चौकातून स्टेशन रोडकडे जात होत्या. यादरम्यान एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या दारात ग्राहकांची गर्दी झाल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यानी वाहन चालकांस तत्काळ वाहन थांबवण्यास सांगितले. त्या थेट उतरून त्या बँकेच्या दारात गेल्या. त्यांचे मागोमाग आलेल्या त्यांचे अंगरक्षकाने आत जाऊन बँकेच्या व्यवस्थापकांना बाहेर आयुक्त मॅडम बोलवत असल्याची सांगितले. तत्काळ व्यवस्थापक बाहेर आले.

आयुक्त बलकवडे यांनी ग्राहक म्हणून आलेल्या महिला व ज्येष्ठांना दारात ताटकळत करू नका. त्यांची आत मध्ये सोय करा. दिव्यांग ग्राहक असेल तर त्यांची तंत्र व्यवस्था करा. सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते की नाही हे पाहण्यासाठी ही सुरक्षारक्षकही दिसत याची त्यांनी व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिले आणि ही कार्यवाही तत्काळ करा. अशा सूचना देऊन त्या निघून गेल्या. कोरोना वाढत्या पार्श्वभूमीवर अत्यंत दक्षपणे आपले कर्तव्य बजावत आयुक्त बलकवडे यांनी आदर्श प्रशासकाचा एक उत्तम नमुना कोल्हापूरकरांच्या पुढे ठेवला. या त्यांच्या सरप्राईज व्हीजिटची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर सर्वत्र फिरत होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर