शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

माळवींचे नगरसेवकपद रद्दला स्थगिती नाही; पुढील सुनावणी ६ जुलैला

By admin | Updated: June 24, 2015 01:03 IST

महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करा; महापालिकेचे विभागीय आयुक्तांना पत्र

कोल्हापूर : राज्य शासनाने नगरसेवकपद रद्दची केलेली कारवाई मागे घ्यावी, या तृप्ती माळवी यांच्या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने याप्रकरणी कोणताही स्थगिती आदेश न देता पुढील सुनावणी ६ जुलैला होईल, असे स्पष्ट केले. स्वीय सहायकामार्फत १६ हजारांची लाच स्वीकारल्याचा ठपका ठेवत तृप्ती माळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. लाचखोरीनंतरही महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या माळवी यांच्यावर महापालिका अधिनियम कलम १३ (१) (अ) व (ब) नुसार नगरसेवकपद रद्दची कारवाईची मागणी सभागृहाने केली होती. त्यानुसार नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सुनावणी घेऊन माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले. राज्यमंत्र्यांच्या या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी माळवी यांनी सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, याप्रकरणी न्यायालयाने स्थगिती आदेश न देता ६ जुलैला सुनावणीचे आदेश दिले. (प्रतिनिधी)महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करा; महापालिकेचे विभागीय आयुक्तांना पत्रमाळवी यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्या अनुषंगाने महापौरपदही रिक्त झाले आहे. या रिक्त पदासाठंी तत्काळ निवडणूक घ्यावी, निवडीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी करणारे पत्र महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांना पाठविले आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशाने लवकरच महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. महापौरपदावर सतेज पाटील गटाच्या मीना सूर्यवंशी, दीपाली ढोणुक्षे किंवा वैशाली डकरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.