मलकापूर : जावली पैकी धाऊडवाडा (ता. शाहूवाडी) येथील शेतकरी इब्राहिम कासम पन्हाळकर यांच्या जनावरांच्या गोठ्यात येऊन बिबट्याने दोन वासरांवर हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. शेतकऱ्यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}इब्राहिम पन्हाळकर यांचे घर जावली पैकी धाऊडवाडा येथे आहे. शनिवार दि.१९ रोजी इब्राहिम पन्हाळकर घराला लागून असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यात जनावरांना वैरण घालून घरी गेले. शनिवारी मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात शिरून दोन वासरावर हल्ला करून दोन वासरांचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. वनविभागाने तातडीने त्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.