शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करा, सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:00 IST

सकारात्मक निर्णय घेण्याची आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

कोल्हापूर : महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. खासगी आणि धर्मादाय रुग्णालयातदेखील या योजनेंतर्गत उपचार करण्यात यावेत. याशिवाय किडनीसह इतर खर्चिक उपचारासाठी, जादा रक्कमेची तरतूद करण्याची मागणीही आमदार पाटील यांनी केली.आमदार पाटील म्हणाले, महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये काही आजारांसाठी केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये करण्यात येणाऱ्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे इतर खासगी अथवा धर्मादाय रुग्णालयांमध्ये करण्यात येणारे उपचार या योजनेमध्ये समाविष्ट करा.या योजनेमध्ये समाविष्ट काही उपचार महागडे आहेत. किडनीवरील उपचारासाठी सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपयांचा खर्च येतो. अशा उपचारांसाठी निर्धारीत करण्यात आलेल्या मंजूर रकमेमध्ये वाढ करण्यात यावी, तसेच या योजनेमध्ये ज्या रुग्णालयांचा समावेश नाही. त्यांचा समावेश करण्यासंदर्भातील धोरण सरकारने निश्चित करावे, अशी मागणी पाटील यांनी केली. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या योजनेमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये होत असणाऱ्या उपचारांचा समावेश इतर खासगी अथवा धर्मादाय रुग्णालयामध्ये करण्याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमून आठ दिवसांत अहवाल घेण्याचे आश्वासन दिले. सरकारी रुग्णालयांसह इतर रुग्णालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या उपचारांचा समावेश करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री सावंत यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलVidhan Parishadविधान परिषदTanaji Sawantतानाजी सावंत