कोल्हापुरात बनावट नोटा प्रकरणी मोठी कारवाई, गोठ्यातून हजारोंच्या नोटांसह प्रिंटर जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:09 IST2025-10-30T15:03:54+5:302025-10-30T15:09:53+5:30
गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी ६८ हजार ४०० रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोल्हापुरात बनावट नोटा प्रकरणी मोठी कारवाई, गोठ्यातून हजारोंच्या नोटांसह प्रिंटर जप्त
कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे बनावट नोटांचे रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी उघडकीस आणले आहे. गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी ६८ हजार ४०० रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
याबाबत अधिक माहिती अशी, बनावट नोटा प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून इचलकरंजी व दानोळी येथील तरुण यामध्ये सहभागी असल्याची समोर आली. त्यानंतर पोलीस इचलकरंजी येथील एका तरुणाला ताब्यात घेऊन बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनावरांच्या गोठ्यामध्ये ६८ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. यामध्ये इचलकरंजी, दानोळी येथील तरुणांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू केला असून यामध्ये मोठे रॅकेट आहे का याचा तपास सुरू आहे.