शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:35 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'बाबत आता कोल्हापुरातील आणखी एका महिला नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यभरात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा सुरू आहेत. महायुतीने आणलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची' राज्यभर चर्चा सुरू आहे. या योजनवरुन भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनी काही दिवसापूर्वी वादग्रस्त विधान केले होते. दरम्यान, आता कोल्हापुरातून आणखी एक या संदर्भात बातमी समोर आली आहे.  कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी एका सभेत १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार, असं वादग्रस्त विधान केले आहे. 

शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 

भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. महायुतीच्या या योजनेची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीतही ही योजना फायद्याची ठरत आहे. तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील एका सभेत वादग्रस्त विधान केले होते. आता पुन्हा एकदा  कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी वादग्रस्त विधान केले आहे. 

करवीर पन्हाळा गगनबावडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ गारीवाडे या गावातील जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे विधान केले. महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव म्हणाल्या,  १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार अस वक्तव्यं केलं आहे. या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

धनंजय महाडिकांनीही केले होते वादग्रस्त विधान

एका सभेत बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे. ''जर इथे काँग्रेसची रॅली निघाली आणि त्यामध्ये आपल्या योजनेचे १५०० रुपये घेतात त्या महिला दिसल्या त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गायचे त्यांचे असे नाही चालणार'', असे दम महाडिक यांनी भरला आहे. भर सभेमध्ये महाडिक यांचे हे वक्तव्य आलेले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024kolhapurकोल्हापूरBJPभाजपाMahayutiमहायुती