शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 00:03 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरातील उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार बदलला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :  विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवार याद्या अजूनही जाहीर होत आहेत. काँग्रेसने आज पाचवी यादी जाहीर केली. या यादीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात आधी जाहीर केलेला उमेदवार काँग्रेसने आता बदलला आहे. याआधी काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. पण कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता पुन्हा उमेदवार बदलण्यात आला आहे. आता काँग्रेसने मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर

काँग्रेसने दोन दिवसापूर्वी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात राजू लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली.  या उमेदवारीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आज कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात ट्विस्ट आला आहे. काँग्रेसचा उमेदवार बदलावा यासाठी नाराज नगरसेवकांनी  मधुरिमाराजे यांची भेट घेत मनधरणी केली आहे. आज याबाबत वाड्यावर बैठक झाली.  यानंतर आता काँग्रेसची नवीन यादी आली या यादीत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

नाराज कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. याबाबत आज बैठक झाली. महायुतीमध्येही कोल्हापूर उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन चर्चा सुरू होत्या. शिंदे गटाने काल माजी आमदार राजेश श्रीरसागर यांच्या नावाची घोषणा केली. पहिल्या यादीत महायुतीने उत्तरचा उमेदवार जाहीर केला नव्हता त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू होत्या.  आता उत्तर विधानसभेत शिंदे गटाच्या राजेश श्रीरसागर यांच्याविरोधात मधुरिमाराजे छत्रपती अशी लढत होणार आहे.

लाटकर समर्थकांचा उद्रेक 

दिवसभरात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर रात्री उशिरा कावळा नाका परिसरात लाटकर समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले. लाटकर समर्थकांनी घडलेल्या घटनेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. उद्या सकाळी शाहू महाराजांकडे याबाबत न्याय मागणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील