Maharashtra Vidhan Sabha 2019 : दसऱ्यानंतर प्रचाराने घेतली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 03:05 PM2019-10-10T15:05:07+5:302019-10-10T15:07:03+5:30

दसऱ्याचा सण संपल्याने विधानसभेच्या प्रचाराला आता गती येणार आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांसह मतदार नवरात्रौत्सवात अडकल्याने प्रचार काहीसा थंडावला होता. आता पुन्हा वेग आला असून, कार्यकर्त्यांची फौज सरसावली आहे. येत्या चार-पाच दिवसांपासून जेवणावळीसह इतर घडामोडींना वेग येणार आहे.

 Maharashtra Vidhan Sabha 2019: After ten decades, the campaign has taken a lead | Maharashtra Vidhan Sabha 2019 : दसऱ्यानंतर प्रचाराने घेतली गती

Maharashtra Vidhan Sabha 2019 : दसऱ्यानंतर प्रचाराने घेतली गती

Next
ठळक मुद्देकार्यकर्त्यांची फौज सरसावली जेवणावळी वाढणार

कोल्हापूर : दसऱ्याचा सण संपल्याने विधानसभेच्या प्रचाराला आता गती येणार आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांसह मतदार नवरात्रौत्सवात अडकल्याने प्रचार काहीसा थंडावला होता. आता पुन्हा वेग आला असून, कार्यकर्त्यांची फौज सरसावली आहे. येत्या चार-पाच दिवसांपासून जेवणावळीसह इतर घडामोडींना वेग येणार आहे.

विधानसभेचे बिगुल वाजल्यापासून छोट्या-मोठ्या सभा, गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. सगळ्यांनी प्रचाराचे नारळ फोडून काम सुरू केले असले, तरी दसरा सणामुळे अद्याप दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते गेली आठ-१0 दिवस प्रचारात काहीशी मरगळ दिसत होती. अनेक गावांत ग्रामदैवताचा उपवास करणाऱ्या नवरात्रौकरूंना गाव सोडता येत नसल्यानेही प्रचारात सक्रिय होता येत नव्हते.

कार्यकर्त्यांच्या बळावरच निवडणुकीतील यंत्रणा गतिमान होण्यास मदत होते. नवरात्रौत्सव संपल्याने कार्यकर्ते मोकळे झाले आहेत. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला गती येणार आहे. प्रचारासह गुप्त हालचाली वेगावणार असून, हळूहळू ग्रामीण भागातील वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे.

प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज सरसावली आहे. जेवणावळीसह इतर घडामोडींना वेग येणार असून, हालचाली गतिमान झाल्या आहेत. जसे मतदानाची तारीख जवळ येईल, तसे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत.
 

 

Web Title:  Maharashtra Vidhan Sabha 2019: After ten decades, the campaign has taken a lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.