शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आम्हाला मतदानाला या, असं कोण म्हणालंच नाही; ऊसतोड मजुरांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 16:19 IST

आयुब मुल्ला खोची: लोकशाहीतील मतदानाचा दिवस हा उत्सव म्हणून मोठ्या ईर्षेने जिद्दीने हातकणंगले तालुक्यात साजरा केला गेला. तर दुसरीकडे ...

आयुब मुल्लाखोची: लोकशाहीतील मतदानाचा दिवस हा उत्सव म्हणून मोठ्या ईर्षेने जिद्दीने हातकणंगले तालुक्यात साजरा केला गेला. तर दुसरीकडे बीड,नाशिक,जालना या जिल्ह्यातून ऊस तोडीसाठी आलेले ऊसतोड मजूर मात्र मतदानापासून वंचित राहत आपल्याच कामात मग असल्याचे चित्र काही ठिकाणी पहावयास मिळाले. आम्हाला कोणी बोलावलं नाही..साधा फोन सुद्धा केला नाही.. जर उमेदवारांनाच गरज नसेल.. तर आम्ही कशाला मतदान करायचे... अशा प्रतिक्रिया या ऊसतोडमजूर मतदारांनी व्यक्त केल्या. निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे परंतु हेच प्रयत्न मात्र या ऊसतोड मजुरापर्यंत पोहोचले नसल्याचे हे चित्र पाहावयास मिळाले. नरंदे परिसरात शेकडो ऊसतोड मजुरांची कुटुंबे मतदान करण्यापासून वंचित राहिली.तालुक्यात आज सकाळपासूनच मतदानाची धांदल उडाली होती. नरंदे ,बुवाचे वठार, खोची, सावर्डे, कुंभोज या परिसरातून मतदारांना नेण्या आणण्यासाठी गाड्या खचाखच भरून जात होत्या. मतदारांच्या चेहऱ्यावर उत्साह जाणवत होता. लोकशाहीतील महत्त्वपूर्ण असा मतदानाचा हक्क बजावण्याचा अभिमान चेहऱ्यावर दिसत होता. या जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांच्या रस्त्याच्या बाजूलाच निवाऱ्यासाठी खोपट मारत तर काहीजण जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करत आपल्याच कामात मग असणारे शेतमजूर दिसत होते.त्यांना परिसरातील गावात मतदानासाठी लोक गाड्यातून जात आहेत आणि आपण मतदान करण्यापासून वंचित राहिलो आहे याची जाणीव होत होती.परंतु आपणास मतदानाला या असे कोण म्हणालेच नाही याची खंत मात्र वाटत होती.ना पुढारी..ना निवडणूक यंत्रणा.. यातील कोणीच संपर्क केला नाही ही खरी असंवेदिनशीलता म्हणावी लागेल.

आम्ही दोन दिवसापूर्वी ऊस तोडणी साठी गाव सोडून बाहेर पडलो.ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये साहित्य भरून पोरा बाळासह आलो.परंतु तुम्ही मतदान करून दोन दिवसांनी जावा असे कोणी ही म्हटले नाही.इथे पोहचल्यावर पण ना फोन केला ना वाहन पाठविले.त्यामुळे आम्ही मतदान करू शकलो नाही.- अशोक वायभसे,बीड जिल्हा) 

पैशाची उचल आहे.जास्तीत जास्त काम करून  त्याची परतफेड करावीच लागेल.त्यामुळे कामाच्या ओढीने या भागात आलो आहे.आम्हाला कोण उभा याच्याशी काही मतलब नाही.ज्यांना मतदान पाहिजे ते पण आम्हाला भेटले नाही आणि बोलावले पण नाहीत.आम्ही आता येथे निवाऱ्याची सोय करीत बसलो आहे. - विनोद कांबळे केज मतदारसंघ,बीड)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरbeed-acबीडVotingमतदानSugar factoryसाखर कारखानेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024