शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महायुती सरकार सत्तेतून पायउतार होईल, मल्लिकार्जुन खर्गे यांचा विश्वास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 12:58 IST

राज्याला स्थिर सरकार देणार

कोल्हापूर : पन्नास खोके एकदम ओकेवाले हे महायुतीचे सरकार आता सत्तेतून पायउतार होईल. एक सक्षम आणि स्थिर सरकार आम्ही महाराष्ट्र राज्यात देऊ, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सांगली येथील सभेसाठी गेलेल्या खर्गे यांनी कोल्हापूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.खर्गे म्हणाले, महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निमित्ताने, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई या ठिकाणी मी गेलो आहे, या ठिकाणी जनतेचा चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळत आहे. महायुती सरकारला जनता कंटाळली आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेते मिळून आम्ही मुख्यमंत्री ठरवू. आमच्यात कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, कर्नाटकचे आमदार हसन मौलाना, माजी आमदार अंजली निंबाळकर उपस्थित होते.

तिकडे जळीतकांड.. तुम्ही प्रचारात..उत्तर प्रदेशमधील झांसी येथील रुग्णालयात दहा चिमुकल्यांचा जळीत कांडात जीव गेला..मणिपूरमध्ये लोकांना मारले जात आहे. जाळले जात आहे. मात्र, योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात प्रचार करत फिरत आहेत या शब्दांत खर्गे यांनी योगींवर हल्ला चढवला.

खोके सब ओके भी नहीभाजपला हरवण्यासाठी आम्ही एक झालो आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार बनवताना कोणतीही अडचण येणार नाही. महाराष्ट्रात आमचे सरकार बनवणार, राज्यातल्या जनतेला नवीन सरकार आम्ही देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणताही घोडेबाजार होणार नाही. ज्यांना आम्ही संधी दिली आहे ते कुठेही जाणार नाहीत.. खोके सब ओके भी नही है.. असा टोलाही त्यांनी महायुती आघाडीला लगावला.

खुर्ची डळमळीत असल्यानेच तालुका पातळीवर सभाआम्हीदेखील खूप निवडणुका पाहिल्या आहेत. मात्र, राज्यस्तरावरील निवडणुकासाठी कधी आम्ही गेलो नाही. देशाचं काहीतरी भले करण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडले आहे. मात्र पंतप्रधानांची खुर्ची डळमळीत असल्यानेच ते सत्ता वाचवण्यासाठी आता तालुका पातळीवरदेखील जात आहेत. अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024