शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून ऋतुराज, राहुल पाटील, राजूबाबा आवळे यांना उमेदवारी जाहीर, ‘कोल्हापूर उत्तर’ची मात्र प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 11:58 IST

कोल्हापूर : काँग्रेसने जिल्ह्यातील तीन उमेदवारांची गुरुवारी रात्री घोषणा केली. कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील , हातकणंगलेतून आमदार राजूबाबा ...

कोल्हापूर : काँग्रेसने जिल्ह्यातील तीन उमेदवारांची गुरुवारी रात्री घोषणा केली. कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील, हातकणंगलेतून आमदार राजूबाबा आवळे आणि करवीर मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. या तिघांचीही उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यामुळेच गुरुवारी ऋतुराज पाटील आणि राहुल पाटील यांनी अर्जही दाखल केले. मात्र काँग्रेसला अजूनही ‘कोल्हापूर उत्तर’साठी तगडा उमेदवार मिळालेला नाही.काँग्रेसचे विधान परिषदेचे नेते सतेज पाटील यांचे ऋतुराज हे पुतणे असून डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत. त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत तत्कालिन आमदार अमल महाडिक यांचा ५३ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. पाटील हे दुसऱ्यांदा रिंगणात उतरत असून पुन्हा पाटील महाडिक लढत रंगणार आहे.काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे राहुल हे चिरंजीव असून पाटील यांच्या निधनानंतर राहुल हेच त्यांचे राजकीय वारसदार असणार हे नक्की होते. राजीव गांधी सूतगिरणीचे अध्यक्ष असलेल्या राहुल यांनी दोन वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले. ते पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. पाटील यांच्याविरोधात शिंदेसेनेचे चंद्रदीप नरके आणि जनसुराज्यचे संताजी घोरपडे हे रिंगणात असतील.माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे चिरंजीव असलेले राजूबाबा हे दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांनी गेल्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा सहा हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. आता पुन्हा डॉ. मिणचेकर रिंगणात उतरण्याची शक्यता असून जनसुराज्यचे अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणkarvir-acकरवीरhatkanangle-acहातकणंगलेcongressकाँग्रेसRuturaj Patilऋतुराज पाटील