शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मुलांना मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 12:46 IST

जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू

कोल्हापूर : सध्या मुलींना मोफत शिक्षण दिले जात असले तरी मुलांनी काय घोडे मारले आहे. त्यांनाही अशा शिक्षणाची नितांत गरज असून महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मुलांना सर्व प्रकारचे मोफत शिक्षण देणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी आदमापूर (ता. भुदरगड) येथे केली.उद्धवसेनेचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ठाकरे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. खासदार शाहू छत्रपती, विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर हिंदु-मुस्लीम व इतर समाजात तेढ निर्माण करून तोडा आणि फोडा नितीने भाजपचे सरकार सत्तेत बसण्याची स्वप्ने बघत आहे. राज्यातील सगळे उद्योग गुजरातला नेले जात असून मुंबईसह महाराष्ट्र त्यांना लुटून न्यायचा आहे. मात्र, हे राज्य स्वाभिमानी असून ते कधीही तुटु आणि लूटू देणार नाही. मी मुख्यमंत्री असताना त्यांना महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहू दिले नाही. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ दिला नाही. हेच खुपल्याने भाजपने माझे सरकार पाडले.आता चेल्याचपाट्यांना बसवून ते महाराष्ट्र लुटत आहेत. अशा महाराष्ट्रद्रोह्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. मुलींना मोफत शिक्षण दिले जात असले तरी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुलांनाही मोफत शिक्षण देणार आहे. माझे सरकार पाडले नसते तर मी पुन्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती.

प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणारभाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला. मंत्री, राज्यपालांनी महाराजांचा वारंवार अपमान केला. महाराजांचा अवमान जनता विसरलेली नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणार असल्याची घोषणा करत ठाकरे यांनी याच मंदिरात महाराजांचा अवमान करणाऱ्यांना नाक घासायला लावणार असल्याचा इशारा दिला. गद्दारांना ज्या सुरतमध्ये ठेवले होते त्या सुरतमध्येही महाराजांचे मंदिर उभे करणार, भाजपच्या नेत्यांनी मला अडवून दाखवावे, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवूलाडकी बहीण योजनेच्या पैशामुळे राज्यातील एका तरी कुटुंबांचे समाधान झाले आहे का, असा सवाल ठाकरे यांनी विचारला. महागाईमुळे जनता त्रस्तू असून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यास जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार असल्याचा शब्द त्यांनी दिला.

तीन भाऊ, जाऊ तिथे खाऊराज्यात देवा भाऊ, दाढीवाले भाऊ व जॅकेटवाले भाऊ असे तीन भाऊ असले तरी त्यांची जाऊ तिथे खाऊ ही पद्धत आहे.

बाळूमामांचे घेतले दर्शनउद्धव ठाकरे व पुत्र तेजस ठाकरे यांनी सभेला येण्यापूर्वी आदमापूर येथील बाळूमामांचे दर्शन घेतले. धनगरी ढोल वाद्यांच्या निनादात त्यांचे मंदिरापासून सभास्थळापर्यंत स्वागत करण्यात आले. यावेळी घोंगडे, काठी देऊन के. पी. पाटील यांनी ठाकरे यांचा सत्कार केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४radhanagari-acराधानगरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEducationशिक्षणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024